तारापूर एमआयडीसीत चिमण्यांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:59 PM2018-10-15T23:59:33+5:302018-10-15T23:59:51+5:30
समाज कंटकानी पुरावे केले नष्ट : प्रदूषण नियंत्रणने फक्त पाण्याचे नमुने गोळा केले
- पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये एका कारखान्याच्या बागायतीच्या झाडांजवळ असंख्य चिमण्या मृत्युमुखी पडल्या असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र चिमण्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण शोधण्यासाठी त्या ताब्यात घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाशी वेळीच समन्वय न साधल्याने त्यांना घटनास्थळावरून कुणीतरी गायब केल्याची माहिती पुढे येत आहे.
शुक्र वार (दि.१२) सकाळी टी झोन मधील नाल्यामधून मोठ्या प्रमाणात वाहत जाणाºया पिवळ्या रंगाच्या रासायनिक सांडपाण्यास उग्र वास येत होता तर शेजारच्या बागेमध्ये २१ चिमण्या वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या होत्या तर, काही मृत्यूशी झुंज देत होत्या. तरफडणाºया या चिमण्यांना पाणी पाजून वाचिवण्याचा प्रयत्न करणाºया येथील टपरी चालकाला त्या उग्र वासाचा त्रास होऊन चक्कर आल्यासारखे जाणवत होते.
शुक्रवारी या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणत: अकरा वाजण्याच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण चे क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी तक्र ारदारांच्या समक्ष घटनेचा पंचनामा करून नाल्यातील उग्र सांडपाण्याचे नमुने पृथ्यकरणासाठी घेतले मात्र, त्या मृत चिमण्या तपासणीसाठी एमपीसीबी कडे सुविधा नसल्याचे कारण सांगून त्या तपासणीसाठी घेण्यात आल्या नाहीत किंवा त्यांनी संबंधित विभागाला वेळीच कळविले नसल्याचे समजते.
दफ्तर दिरंगाईमुळे पुरावे झाले नष्ट
या संदर्भात पालघरचे तहसीलदार महेश सागर यांना सोशल मीडियावर व्हायरल मेसेज वरु न या घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्रथम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली व पंचनामा केलेल्या संबंधित अधिकाºयांकडून घटनास्थळाचा पत्ताही मिळवून पालघरच्या गटविकास अधिकाºयांमार्फत बोईसरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी ए. बी. कोचर यांना दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी (दि.१३) घटनास्थळी पाठविले. मात्र, तेथे डॉ. कोचर यांना मृत चिमण्या न आढळल्याने त्यांना हात हलवत परतावे लागले. यामुळे चिमण्या विषारी वायू मुळे की अन्य कोणत्या कारणाने मृत पावल्या हा प्रश्न आता अधांतरीच राहणार असून हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे.