दोघा गोविंदांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:55 AM2017-08-16T05:55:38+5:302017-08-16T05:55:41+5:30
पालघर तालुक्यातील धनसार (काशीपाडा) येथील रोहन गोपीनाथ किणी (२१) हा तरुण दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून खाली पडून जखमी झाला.
पालघर : दहीहंडी उत्सवाचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना पालघर तालुक्यातील धनसार (काशीपाडा) येथील रोहन गोपीनाथ किणी (२१)
हा तरु ण दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून खाली पडून जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरच्या थरावरून दहीहंडी फोडत असताना त्याला फिट आल्याने तो खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हंडी फोडण्यासाठी नवी मुंबईत आलेला गोविंदा जयेश साईनाथ सरळे (३०) याचा शॉक लागून मृत्यू होण्याची घटना ऐरोली येथे घडली. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात आयोजक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जयेश प्रेमनगर गोविंदा मित्रमंडळाच्या पथकाचा सदस्य होता.