वसईकरांच्या नशिबी मरणही क्लेशदायी, लाकडे नाहीत, साठवण सुविधा नाहीत, दिवे नाहीत, गॅसदाहिनी रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:17 AM2017-10-25T03:17:16+5:302017-10-25T03:17:19+5:30

वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही

Death of Vasaiikar is not tribute, no wood, no storage facilities, no lights, no gas lamps | वसईकरांच्या नशिबी मरणही क्लेशदायी, लाकडे नाहीत, साठवण सुविधा नाहीत, दिवे नाहीत, गॅसदाहिनी रखडलेलीच

वसईकरांच्या नशिबी मरणही क्लेशदायी, लाकडे नाहीत, साठवण सुविधा नाहीत, दिवे नाहीत, गॅसदाहिनी रखडलेलीच

Next

शशी करपे 
वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही. वसईतील मृतदेहांच्या व त्यांच्या आप्तांच्या नशिबी येणा-या क्लेशदायी वस्तुस्थितीचा पर्दाफाश महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे.
वसई विरार महापालिका हद्दीत ८५ स्मशानभूमी असून त्यापैेकी ७७ वापरात आहेत. तर आठ पडून आहेत. पाणी, दिवाबत्ती, लाकडे आदी पायाभूत सुविधा बºयाच स्मशानभूमींमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब किरण चेंदवणकर यांनी स्मशानभूमींना प्रत्यक्ष भेट देऊन चव्हाट्यावर आणली आहे.
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात स्मशानभूमीच्या विकासासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात अगदी नगण्य खर्च करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना परदेशात बसून थेट अंत्यसंस्कार पाहता यासाठी स्मशानभूमींमध्ये कॅमेरे लावण्याची घोषणा करणारी महापालिका बºयाच स्मशानभूमींमध्ये नळजोडणी, दिवाबत्ती, लाकडांसाठी गोदाम देऊ शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिका मोफत लाकडे देते. मात्र, ३३ स्मशानभूमींमध्ये लाकडे ठेवण्यासाठी गोदामे नाहीत. परिणामी दूरवर ठेवलेली लाकडे अंत्यसंस्कारासाठी येणाºया लोकांना वाहून न्यावी लागत आहेत. तर ४१ स्मशानभूमींमध्ये सध्या लाकडे उपलब्ध नाहीत. विरारमधील नारंगी स्मशानभूमीत नळ आहे पण पाणी नाही. चिता रचण्यासाठीचे स्टॅण्ड नाहीत. कार्यरत असलेल्या स्मशानभूमीत दोन ते चार स्टॅण्ड आहेत. पण, प्रत्येक स्मशानभूमीतील स्टॅण्ड तुटलेले आहेत. गास गावातील बंदरवाडी टाकीपाडा स्मशानभूमीत असे स्टॅण्ड नसल्याने दगडाच्या चौथºयावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
२७ स्मशानभूमींमध्ये दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात मोबाइलच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावा लागत आहे. प्रभाग समिती क मधील फणसपाडा आणि कोशिंबे स्मशानभूमीत दिवे आहेत, पण ते कायम बंदच असतात. ७७ स्मशानभूमींसाठी केवळ ५१ कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. तुळींज स्मशानभूमीत नालासोपारा जनसेवा संस्थेचे चार कर्मचारी काम करीत आहेत. कर्मचारी नसल्याने उमराळे आणि उमराळे ब्राम्हण आळीतील स्मशानभूमीत ग्रामस्थ अंत्यविधी करतात. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत स्वतंत्र कर्मचारी नसल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांनाच काम करावे लागत आहे. बहुतेक स्मशानभूमींमध्ये राख काढण्याचे साहित्य नाही. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेने नालासोपारा समेळ पाडा आणि एव्हरशाईन आचोळे येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवलेली आहे. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूदही केली आहे. पण, या दोन्ही गॅस दाहिन्या काम अपूर्ण असल्याने बंद आहेत. या गॅस दाहिनीत प्रत्येकी ४८ सिलेंडर्स आहेत. पण, वापर होत नसल्याने सिलेंडर्सना गंज चढलेला आहे. गरीबांनी गॅस दाहिनीचा वापर केल्यास त्यांना एक हजार रुपये घरपोच देण्याची महापालिकेने घोषणा केली पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. महापालिकेचे स्वत:चे एकही शवविच्छेदन केंद्र आणि शवागर नाही. केवळ एकच शववाहिनी आहे. करदात्यांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
>दफनभूमी, कब्रस्तानच्या वाट्यालाही उपेक्षाच
माणिकपूर शहरात सनसिटी येथे मुस्लीम बांधवांसह इतर धर्मींयासाठी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली आहे. त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा खर्चही करण्यात आलेला आहे. मात्र, याठिकाणची कामे अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाहीत. प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मींयांसाठीची दफनभूमी अद्याप कागदावरच आहे.

Web Title: Death of Vasaiikar is not tribute, no wood, no storage facilities, no lights, no gas lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.