रिक्षा-ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

By admin | Published: March 11, 2017 02:11 AM2017-03-11T02:11:36+5:302017-03-11T02:11:36+5:30

तलासरी-उंबरगाव राज्यमार्गावर गॅस गोडाऊन जवळ ट्रकने दिलेल्या धडकेने रिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात रिक्षामधील विद्यार्थिनी लक्ष्मी धोडी हिचा जागीच मृत्यू झाला

Death of a woman on the spot of rickshaw-truck | रिक्षा-ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

रिक्षा-ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Next

तलासरी : तलासरी-उंबरगाव राज्यमार्गावर गॅस गोडाऊन जवळ ट्रकने दिलेल्या धडकेने रिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात रिक्षामधील विद्यार्थिनी लक्ष्मी धोडी हिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुलीचा मृतदेह तलासरी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून पळून जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडले आहे.
सकाळी सव्वाआठच्या सुमारास कवाडा येथून तालुक्यातील गोदावरी परु ळेकर कॉलेजला रिक्षाने जात असताना तलासरी-उंबरगाव रोडवर उंबरगाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. रिक्षातील चालक सुरेश मेरे हा जखमी झाले असून माजे बसलेली महाविद्यालयीन विद्यार्थिनी लक्ष्मी रमेश धोडी (१९) हिच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रु ग्णालयात हलविण्यात आले होते परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या अपघाताची नोंद तलासरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तलासरी परिसरात एसटी महामंडळाच्या बस अजूनही अनेक रस्त्यावर धावत नसल्याने विद्यार्थी शाळा कॉलेज गाठण्यासाठी मिळेल त्या वाहने जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात. त्यामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of a woman on the spot of rickshaw-truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.