प्रेयसीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:03 AM2018-10-19T00:03:33+5:302018-10-19T00:03:37+5:30
वसई : प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न करणाºया नायगावस्थित तरु णाचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो मागील काही ...
वसई : प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न करणाºया नायगावस्थित तरु णाचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो मागील काही दिवसांपासून टी रु णालयात मृत्यूशी कडवी झुंज देत होता.
नायगाव -दरपाळे गावात हर्षल ठाकूर (२६ ) हा एक तरुण राहत होता. त्याचे मुळगावच्या २१ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. मात्र. तिने हर्षलशी आपले प्रेमसंबंध तोडल्याने तो वैफल्यगृस्त स्थितीत होता. त्याने दि.१० आॅक्टोबर ला आपल्या प्रेयसीला घरी भेटायला बोलावले होते. त्यावेळी दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यात त्याने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. इतक्यावरच न थांबता हर्षलने स्वत: गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेजाºयांनी तात्काळ धावाधाव करीत दोघांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परिणामी वेळीच उपचार मिळाल्याने ती बचावली, परंतु त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जी टी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर बुधवारी सकाळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.