डिसेंबरमध्येच नद्या पडू लागल्या कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:39 AM2018-12-08T00:39:09+5:302018-12-08T00:39:14+5:30
या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे.
- वसंत भोईर
वाडा : या वर्षी दोन महिने अगोदरच पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. तालुक्यातील नद्या तर आत्ताच कोरड्या पडू लागल्याने टंचाई फेब्रुवारी महिन्यापासून जाणवणार आहे. विविध कंपन्या व वीटभट्यांचा पाणीपुरवठा बंद करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
तालुक्याला तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या पाच नद्यांमुळे मुबलक पाणी साठा असूनही नियोजना आभावी तुटवडा जाणवतो. तालुक्यात १६८ गावे व पाचशेहून अधिक पाडे आहेत. त्यामुळे या समस्येने उग्र रूप धारण करीत आहे. येथील रोलिंग मिल्स, शीतपेये बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे पातळीतही घट होत आहे. पूर्वी कुपनलिकेला ३०० फुटांवर पाणी लागायचे आता ५०० फुटांपर्यत खोदकाम करावे लागते. त्यावरुन पाण्याच्या पातळीची कल्पना करता येईल. तालुक्यात रोलिंग मिल्स मोठ्या संख्येने आहेत. त्यातच शीतपेये बनवणाºया कंपन्याही आहेत. त्यांना रोज हजारो लीटर पाणी लागते. त्यातच कंपन्यांनी कारखान्यात सुद्धा कुपनलिका मारल्या आहेत. ते पाणी कमी पडल्यानंतर टॅकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गावोगावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.
>पाच नद्यांवर प्रत्येकी दहा किमी अंतरावर बंधारे बांधले असते तर शेतकºयांबरोबर कारखानदारांचाही पाण्याच्या प्रश्न सुटला असता. या पाणी टंचाईमुळे शेतकºयांचेही मोठे नुकसान होत आहे.
- प्रा.धनंजय पष्टे, सामाजिक कार्यकर्ते
>कुडूस परिसरात लोहोपे येथे विस्तीर्ण बंधारा आहे. या बंधाºयातील गाळ काढल्यास अधिक पाणी साठा होऊन आजुबाजुच्या दहा पंधरा गावातील गावकरी, शेती व उद्योगांचा प्रश्न सुटू शकतो.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते