लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात होणार घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:35 PM2019-10-13T23:35:01+5:302019-10-13T23:35:12+5:30
भात पीक कापणीच्या अवस्थेत : तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क डहाणू/बोर्डी : तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन्लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू/बोर्डी : तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या तीनही कृषी मंडळात खरिपात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. यंदा या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही भागात हळवे पीक कापणीला आले असून शेतातील उभ्या पिकावर खोडकिडा आणि लष्करी अळीमुळे या रोगाची लागण होऊन उत्पादन घटण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
डहाणू तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची बाब कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या निदर्शनास आल्यानंतर, तेथील शास्त्रज्ञांनी क्षेत्र भेटीच्या माध्यमातून पिकांची पाहणी केली. यावेळी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याचे कीटक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्या भात पीक कापणीच्या अवस्थेत आहे. ही लष्करी अळी कमी वेळेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. भात पिकामध्ये मुख्यत: लोंबी किंवा त्याच्या कणसावर हल्ला करते. त्यामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात भाताचे दाणे पडलेले दिसतात. तसेच अळीची विष्टा मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडलेली दिसून येते.
पीक पक्व अवस्थेत असल्याने कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारण्याची शिफारस करता येत नाही. मात्र ही अळी एक शेत संपल्यावर शेजारच्या शेतात जाते. याकरिता बांधावर क्विनालफोस डस्ट किंवा मिथाईल पेराथिआॅन डस्ट धुरळल्यास अळीचा प्रादुर्भाव शेजारच्या शेताला होण्यापासून थांबवता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
ही कीड समजून घेऊन वेळीच योग्य उपयोजना केल्या तर नुकसान होणार नाही. याकरिता लष्करी अळीसाठीचा कामगंध सापळा प्रती एकर सहा याप्रमाणे तर प्रकाश सापळा एक लावणे आवश्यक आहे. तर पक्षी थांबे १० लावणे योग्य ठरेल. कारण ही अळी सहज पक्षांच्या भक्ष्यस्थानी येऊन नैसर्गिक नियंत्रण मिळते.
म्हणून पक्षी आकृष्ट करणे आणि त्यांना भात शेतात बसण्यास जागा उपलब्ध करु न देणे गरजेचे आहे. ट्रायकोकार्डचा वापर ४ कार्ड प्रती एकर (८० हजार अंडी), प्रादुर्भाव दिसू लागल्यास बिवेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक ५ ग्राम प्रति लीटर पाण्यासोबत फवारावे. या पद्धतीने पुढील वर्षाचे नियोजन केल्यास शेतकऱ्याला त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.ाही कृषी मंडळात खरिपात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. यंदा या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही भागात हळवे पीक कापणीला आले असून शेतातील उभ्या पिकावर खोडकिडा आणि लष्करी अळीमुळे या रोगाची लागण होऊन उत्पादन घटण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
डहाणू तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची बाब कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या निदर्शनास आल्यानंतर, तेथील शास्त्रज्ञांनी क्षेत्र भेटीच्या माध्यमातून पिकांची पाहणी केली. यावेळी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याचे कीटक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्या भात पीक कापणीच्या अवस्थेत आहे. ही लष्करी अळी कमी वेळेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. भात पिकामध्ये मुख्यत: लोंबी किंवा त्याच्या कणसावर हल्ला करते. त्यामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात भाताचे दाणे पडलेले दिसतात. तसेच अळीची विष्टा मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडलेली दिसून येते.
पीक पक्व अवस्थेत असल्याने कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारण्याची शिफारस करता येत नाही. मात्र ही अळी एक शेत संपल्यावर शेजारच्या शेतात जाते. याकरिता बांधावर क्विनालफोस डस्ट किंवा मिथाईल पेराथिआॅन डस्ट धुरळल्यास अळीचा प्रादुर्भाव शेजारच्या शेताला होण्यापासून थांबवता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
ही कीड समजून घेऊन वेळीच योग्य उपयोजना केल्या तर नुकसान होणार नाही. याकरिता लष्करी अळीसाठीचा कामगंध सापळा प्रती एकर सहा याप्रमाणे तर प्रकाश सापळा एक लावणे आवश्यक आहे. तर पक्षी थांबे १० लावणे योग्य ठरेल. कारण ही अळी सहज पक्षांच्या भक्ष्यस्थानी येऊन नैसर्गिक नियंत्रण मिळते.
म्हणून पक्षी आकृष्ट करणे आणि त्यांना भात शेतात बसण्यास जागा उपलब्ध करु न देणे गरजेचे आहे. ट्रायकोकार्डचा वापर ४ कार्ड प्रती एकर (८० हजार अंडी), प्रादुर्भाव दिसू लागल्यास बिवेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक ५ ग्राम प्रति लीटर पाण्यासोबत फवारावे. या पद्धतीने पुढील वर्षाचे नियोजन केल्यास शेतकºयाला त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.