कोरोनामुळे एस.टी.च्या उत्पन्नात झाली घट,प्रवासी घटल्याने अनेक फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:16 AM2020-03-19T01:16:45+5:302020-03-19T01:17:15+5:30

डहाणू बस आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली.

Decrease in ST income due to Corona, many rounds canceled | कोरोनामुळे एस.टी.च्या उत्पन्नात झाली घट,प्रवासी घटल्याने अनेक फेऱ्या रद्द

कोरोनामुळे एस.टी.च्या उत्पन्नात झाली घट,प्रवासी घटल्याने अनेक फेऱ्या रद्द

Next

डहाणू/बोर्डी : कोरोना विषाणूचा प्रभाव सर्वच व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात होत असून त्याचा फटका राज्य परिवहन बसलाही बसला आहे. डहाणू बस आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली.
या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांवर विविध निर्बंध घातले असून शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील रु ग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांकडूनही शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जातो आहे. काहींनी खबरदारीचा उपाय योजून लग्न समारंभ, विविध धार्मिक कार्यक्र म रद्द करून घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी प्रवास करण्याचे टाळल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असून गेल्या आठवड्यापासून उत्पन्न कमी झाल्याची माहिती डहाणू आगार व्यवस्थापकांनी दिली. येथून डहाणू-सातारा, डहाणू-कल्याण नगरमार्गे बीड, डहाणू- शिर्डी मार्गे बीड, डहाणू-नाशिक शहादा, डहाणू-वापी (गुजरात) मार्गे नंदुरबार या भागात प्रतिदिन फेºया सुरु आहेत. परंतु नागरिकांनी लांब पल्ल्याचा प्रवास टाळल्याने बसेस रिकाम्या आहेत. असे असताना फेºया सुरु असून इंधन खर्च होऊन उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

३१ मार्चपर्यंत शासनाने विविध निर्बंध कायम ठेवले असून मनाई आदेश काढले आहेत. यात्रोत्सव, आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे स्थानिक फेऱ्यांची प्रवासी संख्याही घटत आहे. डहाणूची महालक्ष्मी यात्रा पंधरा दिवस चालते. याकरिता आगारातून यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात येतात. त्यामुळे यात्रेकरूंकडून चांगले उत्पन्न मिळते. यंदा मात्र ही यात्रा रद्द केली आहे.

आवश्यक सेवा वगळता जव्हारमध्ये दुकाने बंद


जव्हार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार जव्हार, मोखाडा येथील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण जव्हार शहरातील दुकाने बंद करण्याचे आदेश तहसीलदार आणि नगर परिषदेने दवंडी पिटून दिले आहेत. शहरातील व्यापाºयांनी आपली दुकाने १०० टक्के बंद करून याला प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून आणि नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू असून बुधवारपासून किराणा, दूध, भाजीपाला, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे आणि मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिले आहेत. बुधवार १८ मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी दवंडी त्यांनी शहरात फिरून दिली आहे. येथील सर्व कापड व्यापारी, जनरल स्टोअर्स, मांसाहार, सलून, इलेक्ट्रॉनिक दुकाने, कटलरी व्यापारी आदींनी आपली दुकाने बंद केली आहेत. दवंडी फिरवताना बुधवारपासून दुकाने कधीपर्यंत बंद ठेवायची याबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याने ऐन सिझनच्या काळात आणि मार्च अखेरीस व्यापाºयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ज्यांची रोजीरोटी दिवसभराच्या व्यवसायावर अवलंबून आहे, जो रोज छोटी मोठी फेरीची दुकान लावतो अशांनी करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.

जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद करण्याबाबत वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्यामुळे शहरात नगर परिषदेच्यावतीने दुकाने बंद ठेवण्याबाबत दवंडी फिरविण्यात आली आहे. पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच दुकाने उघडण्याबाबत व्यापाºयांना कळविण्यात येईल, तोपर्यंत दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन मी करतो.
- प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद

अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करावे. गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करतो.
- संतोष शिंदे, तहसीलदार जव्हार
 

Web Title: Decrease in ST income due to Corona, many rounds canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.