मनवेलपाड्यातील नळातून रक्तमिश्रित दुर्गंधी पाणी; मटनविक्रेत्याच्या अवैध नळजोडणीचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:00 AM2018-10-09T00:00:31+5:302018-10-09T00:00:41+5:30
विरारच्या मनवेलपाडा येथील शिवशक्ती चाळीत सोमवारी रक्त असलेले दूषित पाणी आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होत. एका मटन विक्रेत्याने बेकायदा नळजोडणी दुकानात घेतल्याने हे पाणी दूषित झाल्याचे उघड झाले.
नालासोपारा : विरारच्या मनवेलपाडा येथील शिवशक्ती चाळीत सोमवारी रक्त असलेले दूषित पाणी आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होत. एका मटन विक्रेत्याने बेकायदा नळजोडणी दुकानात घेतल्याने हे पाणी दूषित झाल्याचे उघड झाले. महापालिकेने दुकानमालकावर कारवाई करून ही बेकायदेशीर नळजोडणी खंडीत केली आहे.
मनवेलपाडा परिसरात नेहमी पाणींटचाई भेडसावत असते. पाणीपुरवठाही नेहमी कमी आणि अपुऱ्या दाबाने होते असतो. सोमवारी मात्र चाळीतील नळाला जे पाणी आले ते केवळ दूषितच नव्हते तर ते रक्ताळलेले होते. त्यात रक्त, मांस, बकºयाची विष्ठा, केस आढळून आल्याने नागरिकांनी तातडीने पाहणी करण्यास सुरवात केली असता जवळपास असलेल्या तनुष्का मटन दुकानदार नाल्याच्या बाजूने बेकायदेशीररित्या मुख्य जलवाहिनीतून जोडणी टाकून पाणी खेचत असल्याचे दिसून आले.
मुख्य जलवाहिनीला बेकायदेशीर जोडणी करून ती त्याने दुकानात घेतली होती. त्यामुळे दुकानाचे दूषीत पाणी कचरा नळावाटे मुख्य जलवाहिनीत गेला आणि तेच दूषित पाणी रहिवाशांना आले.
याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्र ार केली होती. याबाबत बोलताना प्रभाग समिती ब चे सभापती चिरायू चौधरी यांनी सांगितले कि मिळालेल्या माहिती ची तातडीने दखल घेऊन पाण्याची जोडणी काढून टाकली असून मटणाचे हे दुकान बंद करण्यात आले आहे. मनवेलपाडा ते नालासोपारा विभागातील प्रत्येक जलवाहिन्यांच्या जोडण्या तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहे .माझ्या प्रभागात येणाºया मटण आणि चिकन विक्रेत्यांची बैठक देखील घेण्यात येईल.
सकाळी आंम्ही पाणी भरण्यासाठी गेलो होतो.मात्र नळ सुरू करताच तांबडेभडक पाणी येऊ लागल्याने आंम्ही गोंधळून गेलो सुरवातीला काहीच कळले नाही.मात्र नंतर पाहणीअंती हे पाणी रक्त मिश्रित असून त्यात मांसाचे तुकडे, विष्ठा असल्याचे कळाल्याने त्याबाबत स्थानिक नगरसेविकेकडे तक्रार केली.
- सुवर्णा साबळे, रहिवाशी (शिवशक्ती चाळ)
सकाळी विभागातून फोन आल्यावर पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो असता पाण्यात मांसाचे तुकडे आणि रक्त आढळून आले, या पाण्याचे नमुने आम्ही महापालिकेला दिले असून या विभागाची संपूर्ण पाईप लाईन स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
संगीता भैरे, स्थानिक नगरसेविका
जोडणी नेमकी अधिकृत की अनिधकृत याचा तपास झाल्यावरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.आम्ही या घटनेची पूर्ण तपासणी करून योग्य ती कारवाई करू,आम्ही ही जोडणी आता तात्पुरती बंद केली आहे.
- सतीश लोखंडे, आयुक्त वसई महापालिका