कुडूस आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थाने बांधण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:06 AM2020-01-16T00:06:34+5:302020-01-16T00:07:07+5:30

मंजुरी मिळाली तरी कामात दिरंगाई : कर्मचाऱ्यांची होते गैरसोय

Delay in construction of staff accommodation at Kudus Health Center | कुडूस आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थाने बांधण्यास विलंब

कुडूस आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थाने बांधण्यास विलंब

Next

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाचे बांधकाम नोव्हेंबर २०१९ मध्ये मंजूर झाले आहे. मात्र, हे काम अद्यापही सुरू न केल्याने कर्मचाºयांची गैरसोय होत असून नाहक त्यांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.

कुडूस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आली होती. ही निवासस्थाने जुनाट तसेच जीर्ण झाल्याने ती केव्हाही पडण्याचा धोका असल्याने येथील जुनी निवासस्थाने तोडून ती पुन्हा बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान या योजनेतून वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांसाठी निवासस्थानांचे बांधकाम मंजूर झाले असून त्यासाठी २ कोटी ३३ लाख १२ हजार ७७७ इतका निधी मंजूर झाला आहे.

निवासस्थाने बांधकामाचे काम शासनाने शिवसाई कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला दिले असून हे काम १२ महिन्यात पूर्ण करावयाचे आहे. ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. असे असूनही चार महिन्यात हे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे येथील कर्मचाºयांनी भाड्याने निवासस्थाने घेतल्याने विलंबामुळे त्यांना आर्थिक भुर्दड बसत आहे. त्यामुळे ते नाराज आहेत.

जुन्या खोल्या तोडण्यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे अर्ज केला असून अद्यापही त्याला परवानगी मिळालेली नाही.
-शैलेश पाटील, ठेकेदार, शिवसाई कन्स्ट्रक्शन

कर्मचारी निवासस्थानीची पाहणी केली असून प्रस्ताव तयार केला आहे. त्यात त्रुटी असल्याने तो पुन्हा वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल.
-दशरथ मुरूडकर, प्रभारी उपअभियंता, पंचायत समिती वाडा

Web Title: Delay in construction of staff accommodation at Kudus Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.