शाळा परिसरातील फेरीवाले हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:18 PM2017-11-06T23:18:30+5:302017-11-06T23:18:30+5:30
मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे स्थानक परिसरांत बेकायदा ठाण मांडणाºया फेरीवाल्यांवर खळ्ळखट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळांच्या परिसरात
भार्इंदर : मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे स्थानक परिसरांत बेकायदा ठाण मांडणाºया फेरीवाल्यांवर खळ्ळखट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळांच्या परिसरात बसणा-या बेकायदा फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) पालिकेकडे केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालिका हद्दीत अनेक पालिका तसेच खाजगी शाळा आहेत. या बहुतांश शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा फेरीवाले आपले बस्तान मांडून विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शाळेत येजा करण्यास अडचण निर्माण करतात. काही शाळांच्या परिसरातील वाहतुकीचा रस्ताही फेरीवाल्यांनी व्यापला आहे. त्यामुळे शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत वाहतूककोंडी होते. याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे प्रशासनाने केवळ राजकीय दबावासह आर्थिक तडजोडीपोटी दुर्लक्ष केले. काही फेरीवाल्यांनी तर आपण आठवड्याला २०० ते ३०० रुपये हप्ता देत असल्याचे सांगून तेथून हटण्यास नकार दिल्याने फेरीवाल्यांच्या विस्तारात आर्थिक तडजोड असल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या गर्दीत अपघाताची शक्यता बळावते. मनसेने ज्याप्रमाणे रेल्वे परिसरात ठाण मांडणाºया फेरीवाल्यांना हुसकावले, त्याच धर्तीवर पालिकेने शाळा परिसरात बेकायदा बसणाºया फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवावे.