दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही २०० युनिटपर्यंत वीज मोफत द्या; सिडको भवनात आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:58 AM2020-02-08T00:58:49+5:302020-02-08T00:58:52+5:30
वसईत वीजदरवाढीच्या प्रस्तावाला विरोध, केवळ १ ते ५ टक्केच दरवाढीचा महावितरणचा दावा
वसई : महावितरण कंपनीने वीज आयोगाला सादर केलेल्या ६० हजार ३१३ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वसईतील नागरिकांकडून जोरदार विरोध होत असून दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची मागणी जनता दलाने केली आहे. दरम्यान, वीज दरवाढीच्या प्रस्तावावर शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील सिडको भवनात सुनावणी होणार आहे.
वीज दरवाढीच्या प्रस्तावावर शनिवारी होणाºया सुनावणीच्या वेळी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा, प्रदेश जनता दल अध्यक्ष मनवेल तुस्कानो आणि वसई विरार अध्यक्ष कुमार राऊत आदी उपस्थित राहून याप्रसंगी वीज ग्राहकांची बाजू उचलून मांडणार आहेत. दरम्यान, महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांकरिता ६० हजार ३१३ कोटी रुपयांचा वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगापुढे सादर केला आहे. ही दरवाढ १ ते ५ टक्के इतकीच असल्याचा दावा महावितरणने केला असला तरी जनता दलाने मात्र महावितरणचा हा दावा फसवा असल्याचा आरोप केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना वीज ग्राहक संघटनेचे जॉन परेरा यांनी स्पष्ट केले की, सध्याचे सरासरी वीज दर प्रति युनिट जवळपास ६.५० रु पये इतके आहेत. तर पुढे सन २०२०-२१ मधील हा आकार ७.२५ रुपये प्रति युनिट म्हणजेच ७.५० टक्क्यापेक्षा यात अधिक वाढ आहे, तर हीच वाढ २०२४-२५ मध्ये प्रति युनिट ८.२५ रु पये म्हणजेच सध्याच्या दराच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा अधिक