बोगस मजुरांच्या नावे लाखोंचा अपहार, चौकशी व कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 04:17 AM2017-08-25T04:17:03+5:302017-08-25T04:17:07+5:30

सामाजिक वनीकरणा अंतर्गत असणाºया टेन येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये काम न करणाºया आदिवासींच्या नावे त्यांना मजूर दाखवून तेथील लागवड अधिकारी रु चिता संखे हिने लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघड झाले

Demand for millions of names of bogus laborers, inquiries and action | बोगस मजुरांच्या नावे लाखोंचा अपहार, चौकशी व कारवाईची मागणी

बोगस मजुरांच्या नावे लाखोंचा अपहार, चौकशी व कारवाईची मागणी

googlenewsNext

- आरिफ पटेल ।

मनोर : सामाजिक वनीकरणा अंतर्गत असणाºया टेन येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये काम न करणाºया आदिवासींच्या नावे त्यांना मजूर दाखवून तेथील लागवड अधिकारी रु चिता संखे हिने लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघड झाले असून तिच्यावर कारवाई करून निलंबीत करण्यात यावे व वरिष्ठ अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण ठाणे येथे करण्यात आली आहे.
विनोद दळवी, संदेश गणेशकर, अकबर शेख व रमेश सांबरे यांनी माहितीचा अधिकार अर्ज केला असता टेन येथील रोपवाटिका मध्ये काम न करणाºया मजुरांच्या नावे बँक आॅफ महाराष्ट्रच्या मनोर शाखेमध्ये खाते उघडून कैलास दत्तू गणेशकर यास चालक दाखवून त्याच्या खात्यामध्ये ७७,२०७ रुपये, सुरेश लहू सवरा ७४,१४२ रुपये, इंदू १४,१२६ रुपये, निर्मला सुतार ४३,८३४ रुपये असे एकुण १४ जणांच्या नावे लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. तसेच स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता या योजने अंतर्गत उधानासाठी आॅगस्ट २०१६ दरम्यान ३,४४,२३२ रु पये खर्च केले असे दाखवले आहेत परंतु कॅश बुक तपासणी केली असता त्या मध्ये १,९४,३६१ रु पये दाखवले आहेत त्या पैकी १,४९,८७१ रुपयांचा फरक दिसत आहे. या प्रकरणात बोगस नावांचा वापर करुन १,९४,३६१ रु पये खर्च केल्याचे दाखवले आहे. रंजना दत्तू गणेशकर ९२९९, निर्मळ सुतार ९२९९, मीना बाबू गायकवाड ९२९९, अर्पणा ९२९९ असे बोगस मजुरांचे नावे लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघडकीस आले असून लागवड अधिकारी रु चिता संखे हिची चौकशी करुन तिला निलंबित करण्यात यावे व त्या मध्ये सहभागी असणाºया सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सतीश फाले विभागीय वन अधिकारी व सामाजिक वनीकरण ठाणे यांच्या कडे करण्यात आली आहे.

Web Title: Demand for millions of names of bogus laborers, inquiries and action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.