पालघरमधील मतमोजणीला स्थगिती देण्याची मागणी, बळीराम जाधव यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:58 AM2019-05-07T06:58:31+5:302019-05-07T06:59:23+5:30

पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे.

Demand for the postponement of Palghar's resignation, Baliram Jadhav's stance protest | पालघरमधील मतमोजणीला स्थगिती देण्याची मागणी, बळीराम जाधव यांचे ठिय्या आंदोलन

पालघरमधील मतमोजणीला स्थगिती देण्याची मागणी, बळीराम जाधव यांचे ठिय्या आंदोलन

Next

- हितेन नाईक
पालघर - पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या विक्रमाबाबत साशंकता व्यक्त करून बविआचे उमेदवार व माजी खासदार बळीराम जाधव यांनी नवीन मतदारांची नोंद कोणत्या विधानसभा क्षेत्रात झाली, त्यांनी कुठे मतदान केले याची माहिती मागितली असून जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत २३ मेच्या मतमोजणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
सोमवारी माजी खासदार बळीराम जाधव, बविआचे ज्येष्ठ नेते प्रवीण राऊत, जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांची भेट घेतली. नवीन मतदारांची नोंदणी करताना त्यांनी बीएलओ मार्फत तपासणी व पडताळणी होणे आवश्यक असते. काही विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवसाला ३०० पेक्षा अधिक मतदारांची सरासरी दररोज नोंदणी केली गेली असून याबद्दल मला शंका वाटते. यामुळे नव्याने नोंदविल्या गेलेल्या मतदारांच्या कागदपत्राची उच्चस्तरीय समितीने पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार बळीराम जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.
हे नवमतदार नेमके कोणत्या विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये नोंदले गेले, तसेच किती मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले याची माहिती द्यावी. नवीन मतदार नोंदणी तसेच यंदा लोकसभा निवडणुकीत झालेले वाढीव मतदान यांच्यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याची शक्यताही यांनी व्यक्त केली. जोपर्यंत बुथनिहाय मतदानासंदर्भात माहिती मिळत नाही तोपर्यंत २३ मे रोजी होणाºया मतमोजणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले आहे. संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत त्यांना माहिती उपलब्ध झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

याचिका केली दाखल

पालघर नागरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाची नोंद करण्यात आल्याची पुराव्यासह माहिती शिवसेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, गटनेते कैलास म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील आदींनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयासह निवडणूक आयोगाकडे दिली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवीत याचिकाही दाखल केलेली आहे. या बोगस मतदारांसंदर्भातील तक्र ारी केल्यानंतर त्याची मागितलेली माहितीही दिली जात नसल्याने प्रशासनातील काहींचा यात समावेश असल्याची शंका पालघर शहरातून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Demand for the postponement of Palghar's resignation, Baliram Jadhav's stance protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.