भरतीला स्थगिती देण्याची मागणी, खासदार गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:22 AM2018-06-07T01:22:26+5:302018-06-07T01:22:26+5:30
तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील भरती प्रक्रि ये वरून तारापूरचे प्रकल्प पीडित व स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्या नंतर पालघरचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी आंदोलक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांना व एनपीसीआयएलला विनंती केली.
- पंकज राऊत
बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील भरती प्रक्रि ये वरून तारापूरचे प्रकल्प पीडित व स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्या नंतर पालघरचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी आंदोलक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांना व एनपीसीआयएलला विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तारापूर प्रकल्प पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मध्ये करण्यात येणाऱ्या नोकर भरती प्रक्रि ये बाबत संशय व आरोप करून सोमवारी (दि ४ जून) तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचाºयांना घेऊन जाणाºया बसेस वर दगडफेक करून पाच बसेस च्या काचा फोडून सुमारे १० तास अणुकेंद्राचा रस्ता रोखून शेकडो प्रकल्पग्रस्त व स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता
सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले तर या बैठकीत राजस्थान, मद्राससह इतर राज्यामध्ये प्रादेशिक भाषेमध्ये परिक्षा होते त्या प्रमाणे तारापूरच्या भरती प्रक्रि येची परीक्षा मराठीतून घेण्यात यावी या कडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येऊन तारापूर अणुकेंद्रात नोकर भरतीमध्ये ८० टक्के नोकºया या प्रकल्प पीडितांना व स्थानिकांना देण्यात याव्यात, या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी खासदार गवितांनी करून दुर्दैवाने अणुशक्ती केंद्रामध्ये या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत एनपीसीआयएलचे सीएमडी व केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांकडे लवकरच माझ्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प पीडितांना नोकरीत सामावून घेण्यासंदर्भात कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे सांगितले.
यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार मनीषा चौधरी, डहाणू नगराध्यक्ष भरत रजपूत, भाजप पदाधिकारी प्रमोद आरेकर, विजय तामोरे, यांच्यासह बाळू पाटील, अजित म्हात्रे, हरकेश तामोरे, महेश पाटील, शेखर तामोरे, प्रकल्प बाधित कामगार भरती आंदोलनात सहभाग घेतलेले विद्यार्थी व मनमोहन पाटील आदी उपस्थित होते.