सूर्याच्या पाण्यासाठी आंदोलकांचे उपोषणास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:04 AM2018-03-19T03:04:34+5:302018-03-19T03:04:34+5:30
सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
पालघर: सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. मोर्चे, बंद सारख्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गावागावातील, पाड्यापाड्यातील घराना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असतांना एमएमआरडीएला हाताशी धरून राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे वळविण्यात काही लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. भविष्यात त्याचा मोठा फटका तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांवर होणार असून लोकांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नसल्याची परिस्थिती उद्भवणार आहे. तसेच पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.
शासन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करील असे आमचे मुख्यमंत्री व्यासपीठा वरून सांगत असताना मात्र सूर्या, पिंजाळ प्रकल्पाचे सिंचनासाठी, पिण्यासाठी आरिक्षत ठेवलेले पाणी बिगर सिंचन क्षेत्राकडे वळविण्यास त्यांचे सरकारच पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. ह्यामुळे पालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
आपले हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने सर्व पक्षीय पाठिंबा असलेल्या सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या १८ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित पालघर बंद ला जिल्ह्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. तरीही जिल्हावासीयांच्या भावनांचा कुठलाही विचार हे सरकार करीत नसल्याने आता ह्या सारकरचया दुटप्पी धोरणा विरोधात आण िस्थानिकांच्या पाण्यासाठी उद्यापासून निकराची लढाई लढण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक रमाकांत पाटील ह्यांनी दिली.
>अनेक योजना ठप्प होणार
पालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.