महासूर्यकुंभाचे वाडा येथे प्रात्यक्षिक
By admin | Published: December 4, 2015 12:43 AM2015-12-04T00:43:59+5:302015-12-04T00:43:59+5:30
केशवसृष्टी आयोजित महासूर्यकुंभाचे प्रात्यक्षिक वाडा पंचायत समितीचे सभापती अरुण गौंड व गटविकास अधिकारी निखिल ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
वाडा : केशवसृष्टी आयोजित महासूर्यकुंभाचे प्रात्यक्षिक वाडा पंचायत समितीचे सभापती अरुण गौंड व गटविकास अधिकारी निखिल ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सौरऊर्जेबाबत सर्व स्तरांवर जागृती व्हावी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महासूर्यकुंभाद्वारे वाडा तालुक्यात १४ ते १९ डिसेंबरदरम्यान सौरऊर्जा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात तालुक्यातील १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असून ते सौरऊर्जेच्या साहाय्याने नुडल्स शिजवण्याचे प्रात्यक्षिक करणार आहेत. या कार्यशाळेसाठी केशवसृष्टी सर्व खर्च करणार असून सोलर कुकर, नुडल्स तसेच अत्यावश्यक साहित्य पुरविणार आहे. विद्यार्थी किंवा सहभागी शाळांना कोणत्याही स्वरूपाचे शुल्क भरायचे नाही. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून गुरुवारी प्रात्यक्षिक करण्यात आले. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी प्रा. अरविंद मार्डीकर (स्थानिक संयोजक) आणि संतोष गायकवाड (कार्यक्रमप्रमुख) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केशवसृष्टीमार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)