पालघरमध्ये डेंग्यूची साथ
By admin | Published: October 7, 2016 05:11 AM2016-10-07T05:11:37+5:302016-10-07T05:11:37+5:30
या तालुक्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु असून माहीम रोड वरील सत्तर गाळ्या जवळ राहणाऱ्या बब्बू बोजा या रुग्णाला उपचारासाठी गुजरात
पालघर : या तालुक्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु असून माहीम रोड वरील सत्तर गाळ्या जवळ राहणाऱ्या बब्बू बोजा या रुग्णाला उपचारासाठी गुजरात राज्यातील वलसाड येथील रुग्णालयात नेण्यात आले असून अमिता कुडू यांना डेंग्यूची लागण झाल्याने पालघरच्या ढवळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डासाच्या नायनाटासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा डासावर कुठलाही परिणाम होत नसल्याने औषधावरील लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.
पालघरच्या बिडको या औद्योगिक वसाहती जवळील चिंतूपाडा मधील एका कारखान्यात कामगार असलेल्या उदयभान सिंग याचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाल्या नंतर प्रशासना कडून युद्धपातळीवर प्रयत्न होतील अशी अपेक्षा फोल ठरत असून पालघरच्या ग्रामीण रु ग्णालया सह अन्य रु ग्णालयात उपचारा साठी आलेल्या रु ग्णात डेंग्यूसदृश रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रु ग्णांच्या शरीरात २५ हजार ते ४० हजार प्लेटलेसची कमी संख्या आढळून येत आहेत.त्या मुळे डेंग्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून डासांचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढतच चालले आहे.पालघर मधील बब्बु वोजा ह्या रु ग्णा नंतर बोईसरमधील अमतिा कुडू या महिलेलाही डेंग्यू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु हा डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर उपाय योजना आखण्याची मागणी नागरिकांन मधून केली जात आहे. (प्रतिनिधी)