मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दत्तक घेतली जव्हार तालुक्यातील तीन गावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:43 AM2018-03-23T00:43:02+5:302018-03-23T18:55:00+5:30

तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढावा दौऱ्यावर आल्या होत्या.

Deoghar, Kogda, Pathardi villages in Jawhar taluka adopted by Amruta Fadanvis | मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दत्तक घेतली जव्हार तालुक्यातील तीन गावं

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दत्तक घेतली जव्हार तालुक्यातील तीन गावं

googlenewsNext

जव्हार : तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढावा दौऱ्यावर आल्या होत्या.
प्रथम त्यांनी देहरेगाव व आश्रमशाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथून त्या जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी कुपोषित बालकांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या. तेथून त्या जव्हार येथील साईमहल येथील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), पालघर जिल्हा परिषद, जव्हार पंचायत समिती आणि दिव्यज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिकपाळी व्यवस्थापन व अस्मिता योजना जनजागृती कार्यशाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनीही कुपोषण कमी करून रोजगारवाढीकरिता विविध योजना येथे राबवल्या जात असल्याचे सांगितले.
यावेळी उत्कृष्ट अंगणवाडीसेविका म्हणून काम केलेल्या सेविकांना किट व प्रमाणपत्र देऊन व अस्मिता योजनेंतर्गत पुरवठादार म्हणून रजिस्ट्रेशन केलेल्या तालुक्यातील सात बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गेल्या सात महिन्यांपासून बालमृत्यू आणि मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, जिल्ह्यातील कातकरी समाजाचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी कातकरी उत्थान कार्यक्रम सुरू केला आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.


जव्हार हनुमान पॉइंट येथील कौशल्या विकास विभाग व अनिता डोंगरे या संस्थेमार्फत चालणाºया फॅशन डिझाइन केंद्राला त्यांनी भेट दिली. त्यावेळी या योजनेच्या प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांनी केंद्रात शिकवल्या जाणाºया व तेथील महिलांना मिळणाºया रोजगाराबाबत माहिती दिली. तेथून त्या कुटीर रुग्णालयातील नव्याने उभारलेल्या एसएनसीयू विभागाचे उद्घाटन करून विभागाची पाहणी केली. त्यानंतर, त्या शासकीय कन्या आश्रमशाळा, साकूर येथे विद्यार्थिनींना मासिकपाळी व्यवस्थापन व अस्मिता योजनेची माहिती देऊन तेथील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

कुपोषण शून्यावर आणणार
तालुक्यातील अंगणवाडीसेविकांना कुपोषण कसे कमी करता येईल, याबाबत दिव्यज फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी मुलांची खरोखर काळजी तुम्ही घेता, त्यामुळे त्यांची खरी माता अंगणवाडीसेविका हीच असते. पालघर जिल्हा कुपोषित बालकांमुळे नेहमीच चर्चेला येत आहे. तसेच कुपोषणाचे ४० टक्के प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मी आणि तुम्ही मिळून सर्वांनी कुपोषणाचा प्रश्न कायमचा नष्ट करायचा आहे. यासाठी मी आपणास नेहमीच मदत करण्यास तयार असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Deoghar, Kogda, Pathardi villages in Jawhar taluka adopted by Amruta Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.