पाणी असूनही डहाणूतील ३० गावपाडे तहानलेलेच

By Admin | Published: October 15, 2015 01:22 AM2015-10-15T01:22:49+5:302015-10-15T01:22:49+5:30

पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे.

Despite the water thirsty 30 grasshoppers are thirsty | पाणी असूनही डहाणूतील ३० गावपाडे तहानलेलेच

पाणी असूनही डहाणूतील ३० गावपाडे तहानलेलेच

googlenewsNext

शौकत शेख, डहाणू
पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. डहाणूच्या ३० गावांना तसेच खेड्यापाड्यांना रोज शुद्ध पाणी देण्याऐवजी पाच, सहा, आठ दिवसांआड अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांवर विहीर, हातपंपांचे दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डहाणू तालुक्याच्या साखरे धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. परंतु, या धरणावर सर्वप्रथम अधिकार असलेल्या या पंचक्रोशीतील गावे तसेच आदिवासीपाडे यांना आजही पुरेसे व वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ती तहानलेलीच आहेत. येथील सूर्या, कवडास धरणांचे पाणी मुंबई, वसई, विरार भागात रोज दिले जाते. परंतु, भूमिपुत्रांना चार, आठ दिवसांआड पाणी मिळते. डहाणूच्या सागरीकिनाऱ्यावर वसलेल्या ३० गावांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने शासनाने १९९६ मध्ये बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरू करून घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु, या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने येथील मुख्य जलवाहिनी सातत्याने फुटू लागली व येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तर, २००६ मध्ये ही योजना कालबाह्य झाल्याने बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु, निधीअभावी सदर प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला होता. परंतु, आमदार राजेंद्र गावित तसेच आनंद ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश येऊन डहाणू आणि पालघर तालुक्यांतील आदिवासीबहुल बाडा-पोखरणसह ३० गावांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी शासनाच्या पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाने नोव्हेंबर २०१३ ला मंजुरी दिली. ४३ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीस मान्यता देऊन हे काम एका खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले. अनेक महिन्यांपासून कामालाही सुरुवात झाली. परंतु, कामाला गती नसल्याने हे काम वेळेवर पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाडा-पोखरण योजनेची जलवाहिनी वाणगाव, साखरे भागात सातत्याने फुटत असल्याने दुरुस्तीनंतर मातीमिश्रित गढूळ पाणी येत असल्याची तक्रार चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, बहाड डहाणू भागातील हजारो नागरिकांनी केली आहे.

Web Title: Despite the water thirsty 30 grasshoppers are thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.