विनाशकारी बंदर नकोच : मत्स्यव्यवसाय अधिकाºयांना पिटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:40 AM2018-03-06T06:40:00+5:302018-03-06T06:40:00+5:30
डहाणूच्या बंदर पट्टी भागातील असंख्य खेडोपाड्यांमध्ये होणाºया शेती, बागायती तसेच डायमेकिंग व्यवसायाला उद्धवस्त करणारा विनाशकारी वाढवण बंदर कोणत्याही परिस्थीत नकोच अशी ठाम भूमिका घेत सोमवारी डहाणूतील ही मच्छिमारांनी सभा उधळुन लावली.
- शौकत शेख
डहाणू - डहाणूच्या बंदर पट्टी भागातील असंख्य खेडोपाड्यांमध्ये होणाºया शेती, बागायती तसेच डायमेकिंग व्यवसायाला उद्धवस्त करणारा विनाशकारी वाढवण बंदर कोणत्याही परिस्थीत नकोच अशी ठाम भूमिका घेत सोमवारी डहाणूतील ही मच्छिमारांनी सभा उधळुन लावली. त्यामुळे मच्छीमारांची समजुत काढण्याचा मत्स्यव्यवसाय विभागाचा प्रयत्नाला पुन्हा एकदा अपयश आल्याचे दिसून आले.
या सभेच्या माध्यमातून पुन्हा मच्छिमारांनी जोरदार घोषणाबाजी देत वाढवण बंदराला तीव्र विरोध केला आहे. मच्छिमार सोसायटी, पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यासाठी डहाणू येथे मत्स व्यवसाय विभागाकडून बैठक आयोजित केली होती. यावेळी ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक अशोक अंभिरे, ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, गणेश आकरे, शशिकांत बारी, हरेश मर्दे, दिनकर मर्दे, वैभव वझे, नारायण विंदे, नंदु विंदे आदी मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते. डहाणू परिसरातील मच्छीमार सोसायटी आणि त्यांचे प्रतिनिधी व केंद्राच्या मत्स्यकी अनुसंशाधन संस्थांचे वैधानिक आणि तांत्रिक शास्त्रज्ञ पंकज म्हात्रे यांच्या समवेत मत्सव्यवसाय विभागाचे सहा आयुक्त यु.आ. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू मच्छीमार विविध कार्यकारी संस्था यांच्या सभागृहात संपन्न झाली. सहा. मत्सविकास अधिकारी अनिल बाविस्कर उपस्थित होते.
मच्छीमारांच्या भावनांशी खेळू नका! - अंभिरे
वाढवण येथील जागा सॅटेलाईट बंदर उभारण्यासाठी निवडण्यात आली आहे. प्रस्तावित बंदर उभारणीमुळे मत्सव्यवसाय व मत्स्योत्पादन यावर होणारा परिणाम तसेच मच्छीमारांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठीसभेचे आयोजन केले होते.
वाढवण बंदरामुळे मच्छीमार उद्धवस्थ होईल का? त्यामुळे किती मच्छीमार विस्थापित होतील. त्याचा फायदा तोटा काय? हे जाणुन घेण्यासाठी सोमवारी सहा मत्सव्यवसाय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मच्छीमार नेते अशोक अंभिरे यांनी सज्जड इशारा दिला.