वाळू उपशासाठी स्फोटकांचा वापर करणारे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:32 AM2019-03-05T04:32:13+5:302019-03-05T04:32:19+5:30
वसई आणि पालघर जिल्ह्यातील वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे.
नालासोपारा : वसई आणि पालघर जिल्ह्यातील वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि विरार पोलिसांनी चांदीप आणि सायवन येथील कारवाईत वाळू माफियांकडून १८३ जिलेटीनच्या कांड्या आणि साडेआठ किलो स्फोटके जप्त केली आहेत. या प्रकरणी दोघांना अटक झाली. सोमवारी विरार पोलिसांनी पुन्हा सायवन येथे छापा घातला आणि जिलेटीनच्या १२३ कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक ३४५ डिटोनेटर्सच्या आणि सेफ्टी फ्यूजची २१ बंडले जप्त केली. रेतीकरिता माफियांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा मागविल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, विरार पोलिसांच्या साथीने स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून छापा टाकल्याचे पालघर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी म्हणाले.