पालघरचा विकास करणार- विष्णू सवरा

By Admin | Published: June 15, 2016 12:53 AM2016-06-15T00:53:16+5:302016-06-15T00:53:16+5:30

नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला.

Developing Palghar - Vishnu Sawara | पालघरचा विकास करणार- विष्णू सवरा

पालघरचा विकास करणार- विष्णू सवरा

googlenewsNext

विक्रमगड : नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला. या वेळी मराठी पत्रकार संघाची पालघर जिल्ह्याच्या विकासाची भूमिका संघटनेचे पदाधिकारी संजीव जोशी यांनी विषद केली,माझे लक्ष पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यावर राहणार असून,पत्रकाराचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊन नव्या पालघर जिल्ह्याला राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सवरा यांनी सागितले.
आपल्या सरकारने दीड वर्षाच्या काळात सामान्य नागरिक, शेतकरी,आदिवासी, छोटे व्यवसायीक या सर्वासाठी उत्तम कार्य केले असून केंद्र-आणि राज्य सरकारच्या योजना लोकाभिमुख करण्यावर माझा भर होता. पेसा कायद्या अंतर्गत अनुसूचित क्षेत्रासाठी पाच टक्के निधी देऊन ग्रामीण विकासाला गती देण्यात आली आहे. विकास कामात आचारसंहिता आड येत गेल्याने काम दिसत नाही.त्यात नामांकित शाळांमध्ये २५ हजार विद्यारर्थ्यांना मोफत प्रवेश,जात-पडताळणी आॅनलाइन, कुपोषण निर्मूलनासाठी अमृत आहार योजना,आदिवासी कला-परंपरा साठी आदिवासी हाट योजना, एकलव्य क्रीडा योजना, आदर्श ग्राम योजना, शासकीय आश्रम शाळा बांधकाम विभागासाठी स्वतंत्र कक्ष, विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी ४४० हेक्टर जागा आधिग्रहित करण्यात आली आहे.जिल्ह्यातील परिवहनासाठी रस्त्याचे जाळे, अनेक पुलांची निर्मिती, उधोग क्षेत्रासाठी ५२ कोटी रु. मंजूर,जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी अधिक कार्य अशी त्यांनी कामांची जंत्री सादर केली.
मी वसुरी हे गाव दत्तक घेतले असून या बाबतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठी पत्रकार संघाकडून एक गाव दत्तक घेण्यात येणार आहे, आश्रमशाळासाठी स्वतंत्र बांधकाम विभागाची स्थापना केली आहे. सध्या पालघर जिल्यात ५५ कार्यालये नाहीत, पॅटर्न तयार आहे.त्या साठी लवकरात लवकर कर्मचारी भरती होणार आहे, बोईसर येथे २६ एकारात क्रीडा प्रबोधिनी साकारणार आहोत. पालघर जिल्ह्याकडे जाणारे रस्ते चौपदरी करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)

कोणती कामे मंजूर, त्यासाठी निधी किती?

- पालघर जिल्ह्यासाठी २०१५ -१६ अर्थसंकल्पीय ३८२ कामांसाठी ९७ कोटी मंजूर. ६९९ मंजूर कामासाठी १५६ कोटीच्या वर निधी प्राप्त.
- २०१६-१७ मध्ये आदिवासी विकास विभागासाठी ४०८ कामे मंजूर त्या साठी ११५ कोटी निधी प्राप्त, ३४८ कामे मंजूर त्यासाठी ३८ कोटी निधी प्राप्त.
- ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत ८५५ कामे मंजूर त्यासाठी ८६ कोटीचा निधी प्राप्त, सा.बां कामासाठी ११२ कामे मंजूर, ५१३ कोटी निधी प्राप्त पालघर जिल्ह्यासाठी एकूण २४२२ कामे मंजूर त्याकरीता ९११ कोटी ९ लाखाचा निधी प्राप्त झाल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आदीवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी सागितले.

Web Title: Developing Palghar - Vishnu Sawara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.