धारावी किल्ल्याचे संवर्धन की, पुरातत्त्व विभागाची बेजबाबदारी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:23 PM2019-04-20T23:23:51+5:302019-04-20T23:24:09+5:30
भरावामुळे दुर्गमित्रांकडून नाराजी; संवर्धनाच्या नावाखाली खेळखंडोबा
वसई : जंजिरे धारावी किल्ल्यास राज्य पुरातत्व विभागाने नेमणूक केलेला निधी चर्चेचा विषय झाला असून, आजवर सर्वच शासकीय, पुरातत्वीय पातळीवर नामशेष व पूर्णपणे दुर्लक्षित असणारा जंजिरे धारावी म्हणजेच उत्तन चौक भाईदर येथील किल्ल्याचे संवर्धन होणार ही विशेष बाबच आहे. मात्र किल्ल्याच्या अर्तभागात केला जात असलेला मातीचा भरावामुळे सद्या दर्गुमित्रांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या वरील अंगास असणाऱ्या तटबंदीला समांतर मातीचा नवा भराव टाकण्यात आलेला आहे. हा नवीन रस्ता किल्ल्याच्या अंतर्गत भागात का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दर्गमित्रांनी वर्षानुवर्षे स्वच्छ केलेल्या या भागात पुरातत्वीय दृष्टीने अधिक उत्खनन करून इतिहास पुढे आणणे गरजेचे असून त्या ठिकाणी अधिक मातीचा भराव टाकण्यात येत आहे.
विशेष म्हणजे ऐतिहासिक स्थळाच्या पुरातत्वीय कामाचा तपशील देणारा व कार्याची सीमा दर्शविणारा कोणताही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. पण नव्याने तयार करण्यात आलेल्या मातीचा भराव करताना तटबंदीच्या दोन्ही अंगास असणाºया तटबंदीचा, खडकाचा काही भाग तोडण्यात आलेला आहे. हे काही पुरातत्वीय नजरेने काम होत आहे असे दिसत नाही. तटबंदीची डागडुजी व तटबंदीत सामावलेला दरवाजा याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असताना हे नवीन भराव कशासाठी ? या तटबंदीवर, किल्ल्यातील वास्तूंवर वाढत जाणारी धोकादायक झाडी यावर कोणतीही उपाययोजना न करता संवर्धनाचे काम कसे सुरू झाले. या संवर्धन बाबीत गेली अनेक वर्षे किल्ल्यावर सातत्याने संवर्धन करणाºया व किल्ल्याबद्दल तपशील माहिती असणाºया अभ्यासकांना सोबत घेणे आवश्यक आहे.
किल्ल्यासाठी आलेला निधी अशा भरावात संपणार असेल तर किल्ल्याच्या संवर्धनाची बोंब कायम राहणार आहे. अनेकदा किल्ल्यावर प्रत्यक्षात काय काम सुरू आहे. हे राज्य पुरातत्व विभागास अपुºया मनुष्यबळामुळे माहीत नसते.
किल्ले संवर्धनाची दिशा स्पष्ट असावी
राज्य पुरातत्व अंतर्गत शिरगाव किल्ला जिल्हा पालघर व भाईदर मधील घोडबंदर कोट या दोन्ही किल्ल्यांच्या संवर्धनाबाबतीत झालेला खेळखंडोबा सर्वश्रुत असताना जंजिरे धारावी किल्ल्याच्या संवर्धनाची दिशा स्पष्ट असणे गरजेचे आहे याबाबत किल्ले वसई मोहीम परिवार प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी सूचना केल्या.