पूरग्रस्तांसाठी विविध पक्ष एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:58 PM2018-08-23T22:58:16+5:302018-08-23T22:58:41+5:30

नौदल व एअर इंडियाद्वारे पीडितांना पोहोचविली मदत

Different parties gathered for flood victims | पूरग्रस्तांसाठी विविध पक्ष एकवटले

पूरग्रस्तांसाठी विविध पक्ष एकवटले

googlenewsNext

नालासोपारा : केरळमध्ये गेला आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुरग्रस्तांसाठी वसईतील विविध पक्ष व संघटनांनी एकत्र येत जिवनावश्यक वस्तू केरळ कडे रवाना केल्या आहेत.
विरार-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बहुजन विकास आघाडीने आपली सामाजिक बांधिलकी जपली असून पुरग्रस्तांसाठी मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भरीव मदत उभी केली आहे. कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी तीन हजार किलो तांदूळ आणि इतर वस्तू एअर इंडियामार्फत केरळकडे रवाना केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, जिल्हा प्रवक्ता स्टीवन क्र ेस्टो, काँग्रेस कार्यकर्ते गिरीष नायर, राधाकृष्णन, बिजू नायर, सीलू जोसेफ, टिटी थॉमस, बिनॉय आॅगस्टीन, नवीन थॉमस आदि उपस्थित होते. बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडीच्या मार्फत या मोहीमेस वसई विरार महानगरपालिका सभापती प्राची कॉलेसो, माजी सभापती प्रविण शेट्टी, नगरसेवक मनिष वर्तक, नगरसेविका ज्योति धोंडेकर, अ‍ॅड. लोरॉय कोलॅसो, अजिल चाको, बिजु नायर, आशिष राऊत, सॅमसन परेरा, गौरव राऊत, सनी मोसेकर यांनी मदत कार्य केले आहे.

नौदलाची मदत
भाबोळा येथे रविवारी ‘केरळ पुरग्रस्थ मदत मोहीम’ राबविण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी अनेक वस्तू दान केल्या. जमलेले सर्व सामान बसीन केरला समाज या संस्थेकडे सुपुर्त करण्यात आला असून नौदलाद्वारे के रळसाठी रवाना झाला आहे.

Web Title: Different parties gathered for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.