जेवणातील कांदा गायब
By admin | Published: October 9, 2015 11:27 PM2015-10-09T23:27:47+5:302015-10-09T23:27:47+5:30
कांद्याचे दर अद्याप उतरले नसून बाजारात ७० रु. प्रतिकिलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणारा कांदा गायब झाला असून त्याची जागा मुळ्याने घेतली आहे.
वसई : कांद्याचे दर अद्याप उतरले नसून बाजारात ७० रु. प्रतिकिलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणारा कांदा गायब झाला असून त्याची जागा मुळ्याने घेतली आहे. ७० रु.ने कांदा खरेदी करणे परवडत नसल्यामुळे ग्राहक २०० किंवा ३०० ग्रॅम कांदा खरेदी करत असून कांद्याच्या विक्रीवरही चांगलाच परिणाम जाणवला आहे.
सुमारे दीड ते दोन महिने कांद्याचे भाव चढे राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ७० रु. किलो दराने विकल्या जाणाऱ्या कांद्याचा दर्जाही सुमार असून ग्राहक तो कांदा खरेदी करायला तयार नसतो. वसई-विरारमध्ये सर्वसाधारणपणे नाशिक व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कांद्याची आवक होत असते. घाऊक बाजारातील कांद्याचे दर आकाशाला भिडल्यामुळे किरकोळ बाजारातही तो चढ्या भावाने विकण्यात येतो. मध्यंतरी कांद्याचे दर ७० वरून ६० वर आले होते, मात्र गेल्या २ दिवसांपासून या दराने पुन्हा सत्तरी गाठली. कांद्याबरोबर टोमॅटोनेही १० रु. उसळी घेतली असून टोमॅटो ४० रु. प्रतिकिलो दराने विकला जात आहे. (प्रतिनिधी)