उघड्यावरील मासळी विक्रीमुळे ‘अस्वच्छ डहाणू’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:27 AM2019-01-25T00:27:44+5:302019-01-25T00:27:51+5:30

सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे.

'Dirty straw' due to open fish sale | उघड्यावरील मासळी विक्रीमुळे ‘अस्वच्छ डहाणू’

उघड्यावरील मासळी विक्रीमुळे ‘अस्वच्छ डहाणू’

Next

- शौकत शेख 
डहाणू : सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करुन मासळी बाजारासाठी सुसज्ज इमारत बांधुनही तिकडे कुणी फिरकत नसल्याने ‘स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू’ उपक्रम अपयशी ठरत आहे.
साठ हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू नगरपरिषद हद्दीतील लोणीपाडा येथे रस्त्यावर बसणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांसाठी नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड, हैद्राबाद यांच्या कडून महाराष्टÑ राज्या मत्स्य उद्योग महामंडळ यांच्या मार्फत डहाणू लोणीपाडा येथे अद्यावत मासळी मार्केट बांधण्यात आले आहे. तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या दोन वर्षा पासून धूळखात पडली आहे.
सध्या हे ठिकाण जुगार तसेच दारू व गांजा पिणाºयांचा अड्डा झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी डहाणू पारनाका, डहाणू बीच, येथे पर्यटकांच्या सोयी, सुविधांसाठी डहाणू नगरपरिषद व वनसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस लाख रूपये खर्च करून पर्यटन योजनेअंतर्गत स्टॉल, केबीन बनविण्यात आली होती. हे स्टॉल स्थानिक महिला बचतगटांना रोजगार पूरविण्याच्या दृष्टीने देण्यात येणार होती. परंतु पावसाळयात त्याची तुटफूट होऊन सर्व स्टॉल उध्दस्त झाले व शासनाचा निधी वाया गेला आहे. एका बाजुला रस्त्यावर बसणाºया मच्छीमार महिलांना हक्काचे मासळी मार्केट मिळावे यासाठी कोळी बांधव आंदोलन करीत असतांनाच डहणू येथे गेल्या अडीच वर्षापासून सुसज्ज असे मासळी मार्केट बांधून तयार असतांनाच डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे प्रशस्त इमारत ओस पडली असल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
>रखडलेले सुशाभिकरण
दरम्यान शासनाच्या पर्यटन विकास निधीमध्ये डहाणू गावातील मास्जिद नाका येथे गेल्या तीन, चार वर्षापासून रस्ते, तलाव सूशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्याच्यावर साठ ते सत्तर लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून काम बंद आहे. पाठपुराव्याच्या अभावी हे काम रखडले आहे.
>मच्छिमार महिला नव्या मार्केटमध्ये जाण्यास तयार नाहीत.
- विजयकुमार द्वासे, मुख्याधिकारी, डहाणू न.प.मासळी मार्केट

Web Title: 'Dirty straw' due to open fish sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.