नववी प्रवेशापासून १६८२ वंचित
By admin | Published: June 18, 2017 02:00 AM2017-06-18T02:00:42+5:302017-06-18T02:00:42+5:30
या तालुक्यातील नववीच्या ८५ नव्या तुकड्यांचे प्रस्ताव कुंभकर्णी निद्रेतील शिक्षणखात्याने अद्यापही मंजूर न केल्याने १६८२ विद्यार्थ्यांना अद्यापही
सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : या तालुक्यातील नववीच्या ८५ नव्या तुकड्यांचे प्रस्ताव कुंभकर्णी निद्रेतील शिक्षणखात्याने अद्यापही मंजूर न केल्याने १६८२ विद्यार्थ्यांना अद्यापही नववीच्या प्रवेशासाठी वणवण भटकावे लागते आहे. यंदा एकाही विद्यार्थ्याला नववीच्या प्रवेशापासून वंचित रहावे लागणार नाही ही शिक्षणमंत्री तावडे यांनी गेल्या महिन्यात येथे दिलेली ग्वाही त्यामुळे हवेत विरली आहे.
तालुक्यात आठवी प्रवेशाची गंभीर समस्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने तुकड्या कमी असल्याने विद्यार्थी प्रवेश न मिळाल्याने शिक्षण सोडून मजुरी कडे वळत या बाबत दैनिक लोकमत ने नियमित पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषद शाळांत ८ वी च्या ४६ तुकड्या सुरु करण्यात आल्या, हा तात्पुरता उपाय शिक्षण विभागाने काढला पण हा तात्पुरता उपाय १४ वर्षा पर्यंत च्या सर्वाना शिक्षण या कायद्यातून वाचण्यासाठी काढलेल्या उपायाने मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच भल झालं नाही, आठवी नंतर पुन्हा नववीच्या समस्या त्यांच्या समोर उभी राहिली.
१५ जून ला जिल्हा परिषद शाळा सुरु झाल्यानंतर झोपलेले शिक्षण विभाग जागे झाले अन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पत्र व्यवहार सुरु झाले पण माध्यमिक विद्यालयात आठवितच प्रवेश फुल्ल होऊन एका वर्गात दीडशे दोनशे मुलांना कोंबून शिक्षण देणाऱ्या माध्यमिक विद्यालया पुढे शिक्षण विभागाची पत्र घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन बसवायचे कुठे हा प्रश्न दरवर्षी सातवीतून आठवीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४२०० ते ४५०० असून त्यांच्यासाठी माध्यमिक विद्यालयात ३३ व जि. प.च्या ४६ तुकड्या असतात. पण जि. प. शाळांचा दर्जा धड नसल्याने विद्यार्थ्यांचा कल खाजगी माध्यमिक विद्यालयाकडे असतो. या मुळे माध्यमिक विद्यालयांनी ५४ तुकड्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले पण ते प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत.
या तुकड्यांना मान्यता मिळाली तरी आदिवासी तलासरी भागातील विद्यार्थ्यांची नववीची प्रवेश समस्या काही अंशी कमी होईल, तसेच जिल्हा परिषदेनेही नववीच्या ३१ नव्या तुकड्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविले आहेत. पण तेही रखडले असल्याने सध्या तरी तलासरी भागात आठवी नववीची प्रवेश समस्या गंभीर बनली असून विद्यार्थी प्रवेशा साठी वणवण सुरु आहे. तलासरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी के.बी.सुतार याच्या कडे विचारणा केली असता १६८२ विद्यार्थ्यांपैकी ३५० विद्यार्थ्यांना आता पर्यंत प्रवेश देण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात येतील तसेच नववीच्या ३१ तुकड्यांना मान्यता मिळाल्यास प्रवेश समस्या निकाली निघेल.
शिक्षणमंत्र्याची ग्वाही हवेतील बुडबुडे
सध्या जिल्हा परिषद शाळांच्या ४६ तुकड्यांमधून आठवी तुन नववीत गेलेल्या १६८२ विद्यार्थ्यांचा नववी प्रवेश कठीण झाला असून प्रवेशासाठी पालक, विद्यार्थी वणवण भटकत आहे.
नुकतेच शिक्षण मंत्री विनोद तावडे हे तलासरीत येऊन गेले त्या वेळी आमदार पास्कल धनारे व पंचायत समिती सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी तील प्रवेशाची समस्या निदर्शनास आणताच एकही विद्यार्थी नववी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली होती.