आगाशी दूरध्वनी केंद्राची वीज खंडित, फोन्स बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:52 PM2019-03-03T23:52:44+5:302019-03-03T23:52:48+5:30

आगाशी येथील भारत संचार निगम लिमिटेडची दूरध्वनी सेवा गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्यामूळे त्याचा फटका शेकडो ग्राहकांना बसतो आहे.

Disconnect the power of the telephone center in advance, turn off the phones | आगाशी दूरध्वनी केंद्राची वीज खंडित, फोन्स बंद

आगाशी दूरध्वनी केंद्राची वीज खंडित, फोन्स बंद

Next

वसई : आगाशी येथील भारत संचार निगम लिमिटेडची दूरध्वनी सेवा गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्यामूळे त्याचा फटका शेकडो ग्राहकांना बसतो आहे. लाखो रूपयांचे वीजबील थकल्यामुळे महावितरणाने आगाशी केंद्राचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. तालुक्यातील इतर दूरध्वनी केंद्रांचाही वीजबीलांचा भरणा वेळेत न केल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा बंद केला होता.
भारत संचार निगमच्या आगाशी दूरध्वनी केंद्राचा वीजपुरवठा शुक्र वार दिनांक २२ फेब्रुवारी पासून महावितरणाने खंडीत केला होता.आॅक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीतील २ लाख ८६ हजार ४१० रूपये विजबील थकले असल्यामुळे वीजपुरवठा ,खंडित केला होता. वीजेअभावी दूरध्वनी सेवा देणारी उपकरणे बंद पडली व त्याचा फटका १९ पोलर विभागांना पडला. या विभागात नाळा, सत्पाळा, वटार, आगाशी, अर्नाळा, राजोडी व इतर गावे आहेत. सध्या या केंद्रामार्फत ४२२ ग्राहकांना सेवा दिली जाते. पूर्वी हिच संख्या ५५०० होती. मात्र निगमच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांनी पाठ फिरवून इतर कंपन्यांची सेवा घेतल्याने दूरध्वनी बंद असल्यामुळे फोर जी ब्रॉडबॅण्ड घेतलेल्यांची इंटरनेट सेवाही ठप्प झाली आहे. याचा फटका पोस्ट आॅफीस, राष्ट्रीयकृत बॅका, पतपेढ्या, ग्रामीण रूग्णालये, पोलिस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय यांना बसला आहे.
निगमचे संपूर्ण भारतात दूरध्वनीचे जाळे पसरले आहे. दुर्गम खेड्यापाड्यात चांगली सेवा देत असल्याच्या जाहिरातींवर कंपनी लाखो रूपये खर्च करीत आहे.मात्र निधीअभावी दूरध्वनी केंद्राचा विजपुरवठा खंडीत करण्याचा हा प्रकार पहिलाच नाही. विरार पश्चिम, नालासोपारा पश्चिम, विनय युनिक, शिरसाड, बोळींज, देवतलाव, पापडी, सातीवली या दूरध्वनी केंद्रांचाही वीजपुरवठा गेल्या आठवड्यात खंडीत करण्यात आला होता.शनिवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी २ लाख ८६ हजार ४१०रूपयांच्या वीजबीलचा भरणा केल्यानंतर महावितरणाने आगाशी केंद्राचा वीजपुरवठा सुरू केला. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेली उपकरणे आता नादुरूस्त झाल्यामुळे रविवारी संध्याकाळपर्यंत दूरध्वनी सेवा सुरू झाली नव्हती. उपकरणातील अनेक कार्ड खराब झाल्यामुळे ती बदलावी लागणार आहेत. तसेच नविन डेटा अपलोड करण्यासाठी पालघर येथून टेक्निशियन बोलविण्यात आले
आहेत. थकीत बिल भरण्यासाठी निधी मिळत नसल्याने ही वेळ आल्याचे समजते.
>वीजेअभावी उपकरणे बंद, जनरेटरद्वारे वीजपुरवठा
गेल्या दहा दिवसांपासून आगाशी दुरध्वनी केंद्राचा वीजपुरवठा खंडीत केला केल्यामुळे उपकरणे नादुरूस्त होऊ नये म्हणून जनरेटरचा वानर करण्यात येत होता.रोज दोन तास जनरेटरवर ही उपकरणे सुरू ठेवण्याचा कर्मचा-यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी आठ दिवसात 5000 रूपयाचे डिझेल वापरण्यात आले.मात्र शनिवारी वीजबील भरणा केल्यावर महावितरणाने वीजपुरवठा सुरू केल्यावर अनेक उपकरणे नादुरूस्त झाल्याचे लक्षात आले.कार्ड निकामी झाल्यामूळे ती बदलावी लागणार आहेत, तर प्रोग्रॅम पुन्हा अपलोड करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.त्यासाठी टेक्नीशियन बोलविण्यात आले
आहेत.
>निधीअभावी वेळेत बिले भरली जात नाहीत
संपूर्ण भारतात निधीची कमतरता असल्यामुळे भारत संचार निगमला कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार व वीजबिले भरता येत नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत शुक्र वारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींगमध्ये हा विषय उपस्थित केला गेला होता.त्यावेळी पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नायनवरे, खासदार राजेंद्र गावित व वसई डेप्युटी जनरल मॅनेजर विनोद पटणी उपस्थित होते. खाजगी बॅका बी एस एन एल ला लेटर आॅफ कॉम्पोर्ट देत नसल्यामुळे निधीसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते.मात्र नुकतीच त्याला मान्यता मिळाली असल्याचे युनियनकडून सांगण्यात आल्याची माहिती वसईचे डेप्युटी जनरल मॅनेजर विनोद पटणी यांनी दिली.त्यामुळे निधी उपलब्ध न झाल्यास खाजगी बॅकांचे कर्ज घेऊन वीजबिले, पगार वेळेवर होतील.

Web Title: Disconnect the power of the telephone center in advance, turn off the phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.