पालघर जिल्ह्यात प्रयोगशील शेतीतून शोधली विकासवाट; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:07 AM2020-07-01T01:07:28+5:302020-07-01T01:07:36+5:30

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला

Discovery from experimental farming in Palghar district; Efforts to increase farmers' income | पालघर जिल्ह्यात प्रयोगशील शेतीतून शोधली विकासवाट; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न

पालघर जिल्ह्यात प्रयोगशील शेतीतून शोधली विकासवाट; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न

Next

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : पालघर जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीआधारित आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रितपणे प्रयोगशील उपक्रम राबवून जिल्ह्याच्या कृषीविकासाची वाट समृद्ध केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत अवलंबली जात असून पारंपरिक भात शेती, भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत, मत्स्यपालन अशा उपक्रमांमुळे कृषीआधारित रोजगार निर्माण होऊ न बेरोजगारीचा बराच प्रश्न सुटला आहे.

डहाणू येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फेविविध उपक्र म राबवले जातात. मागील वर्षभरात जव्हार, मोखाडा यांसारख्या दुर्गम भागात कर्जत-७, कर्जत-९ या भाताच्या सुधारित जातींची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे भाताच्या उत्पादनात ३२ टक्के तर नागली, वरी या सुधारित जातींच्या उत्पादनात ४१ टक्के वृद्धी झाली. गळीत धान्यपिकांमध्ये खुरासणी पिकाच्या फुले कारळा या जातीचे उत्पादन स्थानिक जातीच्या तुलनेत ५८ टक्के अधिक आढळले.

शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पारंपरिक भात शेतीसह भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत या घटकांचा समावेश केला आहे. तसेच सेंद्रिय पद्धतीबाबतही मार्गदर्शन केले. चिकू, नारळ, केळी आदी फळपिकांवरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रात्यक्षिके घेतली. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढण्यास भाडेतत्त्वावर अवजारे उपलब्ध झाल्याने श्रम, वेळ व पैसा वाचण्यास मदत झाली आहे.

आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला. जिल्ह्यात कृषि विज्ञान मंडळ, तालुका स्तरावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि ग्रामपातळीवर महिला मंडळ, शेतकरी मंडळ यांच्यामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. प्रकल्प संचालक आत्मा योजनेतून राबवलेला चारा पीक, मोगरा पिकाच्या लागवडीच्या प्रशिक्षणाचा जिल्हयातील २०० शेतकºयांना फायदा झाला. गेल्या वर्षी ८२ महिला बचतगट तयार करून महिला सबलीकरणासाठी शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. मधमाशी पालन प्रशिक्षण दिल्याने १२०० शेतकºयांना फायदा झाला. यामध्ये १२ युवक मास्टर ट्रेनर झाले.

अळंंबी लागवड, फळ रोपवाटिका या व्यवसायाचे अनुक्र मे ४० आणि ३० युवकांना प्रशिक्षित केल्याने स्वयंरोजगार निर्मिती झाली. मत्स्यशेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने २० युवकांनी मत्स्यसंवर्धन करण्यास सुरुवात केली. परंपरागत कृषी योजनेमार्फत शेतकºयांचे सेंद्रिय शेती गट तयार करण्यात आले. हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून दोन वेळा शेतकरी सल्ला देण्यात येत आहे. त्याचा पीक नियोजनासाठी फायदा होत आहे. शेतकºयांना माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे जिल्ह्यातील १५०० शेतकºयांना त्याचा फायदा झाला. आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायाबाबत जिल्ह्यातील शेतकºयांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास कृषिविज्ञान केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव म्हणाले.

शहरांची भाजीपाल्याची गरज केली पूर्ण जिल्ह्यातील १२१ शेतकºयांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर मिळाले. ९२ जणांना शेततळे दिल्याने पाण्याचा प्रश्न सुटला. जमीन आरोग्यपत्रिका पथदर्शी प्रकल्प, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविले.

कृषी विकासाचा पाया मजबूत झाल्यानेच लॉकडाऊन काळात शेतकरी गटाने पिकवलेला कृषी माल निर्यात करून महापालिका क्षेत्रातील भाजीपाल्याची निकड पूर्ण केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली.
 

Web Title: Discovery from experimental farming in Palghar district; Efforts to increase farmers' income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी