औषध फवारणीतही होतोय भेदभाव
By admin | Published: July 8, 2017 05:17 AM2017-07-08T05:17:26+5:302017-07-08T05:17:26+5:30
पावसाळी वातावरणामुळे जव्हारमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगरपरिषदने ठिकठिकाणी औषध फवारणी सुरु केली आहे. मात्र
हुसेन मेमन/ लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पावसाळी वातावरणामुळे जव्हारमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगरपरिषदने ठिकठिकाणी औषध फवारणी सुरु केली आहे. मात्र या फवारणीमध्ये नगरसेवक राहत असलेल्या परिसरातच लक्ष केंद्रीत होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मे महिन्याच्या शेवटी शहरातील साचलेला कचरा काढणे, तुंबलेली गटारे मुक्त करणे अदी महत्वाची कामे करण्यात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने पावसाच्या पाण्याने नाक्या नाक्यावर तुंबापुरी के ली. पाणी साचून राहिल्याने जेथे नळाच्या पाईप लाईन फुटल्या आहेत किंवा लिक आहेत अशा ठिकाणी अनेक घरात अशुद्ध पाणी पोहचले. शहरातील जुनी डॅम आळी, एस.टी. स्टॅण्डचा परिसर, नवा पाडा, हनुमान पॉर्इंट रस्ता, सोनार आळी या ठिकाणी फवारणीची गरज असतांना नगरपरिषदेच क र्मचारी विशिष्ट परिसरातच आपली कुमक रुजू करीत असल्याने पालिका नागरिकांची की नगरसेवकांची असा प्रश्न उपस्थित होते आहे.
फक्त कागदं रंगवली जातात
जव्हार शहरामध्ये खेड्यापाड्यातून नागरिक जिन्नसांच्या खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी केरकचरा वाढतो आहे. मात्र, तिकडे दुर्लक्ष करुन स्वच्छता कर्मचारी नगरसेवकांच्या परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन काम फत्ते करीत आहेत.