रोशनीचा कुपोषणाने पेठ रांजणीत मृत्यू

By admin | Published: September 15, 2016 02:10 AM2016-09-15T02:10:51+5:302016-09-15T02:10:51+5:30

वाडा तालुक्यातील पेठरांजणी गावातील रोशनी सवर या दोन वर्षांच्या चिमुकलीचा कुपोषणाने मृत्यू झाला. ती जन्मत: सुदृढ होती.

Disease with illumination of light in pearl | रोशनीचा कुपोषणाने पेठ रांजणीत मृत्यू

रोशनीचा कुपोषणाने पेठ रांजणीत मृत्यू

Next

वाडा : वाडा तालुक्यातील पेठरांजणी गावातील रोशनी सवर या दोन वर्षांच्या चिमुकलीचा कुपोषणाने मृत्यू झाला.
ती जन्मत: सुदृढ होती. मात्र गत ५ महिन्यांत कुपोषणाने तिची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे तिला वाडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी तिच्यावर १४ दिवस उपचार करून तिला घरी पाठविण्यात आले. तेंव्हाही तिला अशक्तपणा जाणवत होता. ती काहीही खात नसल्यामुळे शुक्रवारी तिला वाडा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु श्वसनाचा अधिक त्रास होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाणे येथे पाठवण्यात आले. रोशनीचे वडील नऊ जणांच्या कुटुंबासह झोपडीत राहतात. मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या चिमुकलीचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी आपल्या परिने प्रयत्न केले. परंतु, त्यांना अपयश आले. (वार्ताहर)

Web Title: Disease with illumination of light in pearl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.