भातपिकांना रोगांची लागण; सततच्या पावसामुळे भातशेतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:36 AM2019-10-11T05:36:05+5:302019-10-11T05:36:19+5:30

तालुक्यातील कासा, वाणगाव भागात पावसाळ्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

 Disease infectious diseases; Continuous rainfall affects paddy cultivation | भातपिकांना रोगांची लागण; सततच्या पावसामुळे भातशेतीवर परिणाम

भातपिकांना रोगांची लागण; सततच्या पावसामुळे भातशेतीवर परिणाम

Next

कासा : तालुक्यात शेतकऱ्यांचा भातशेती हा प्रमुख व्यवसाय आहे. डहाणू तालुक्यातील कासा भागात भातपिकाला रोगाची लागण झाली आहे. ही लागण वेळीच आटोक्यात न आल्यास भातशेतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील कासा, वाणगाव भागात पावसाळ्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या हळव्या भातशेतीची कापणी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तर गरव्या भात शेतीची कापणी आॅक्टोबर महिन्याअखेरीस केली जाते. मात्र, सततच्या पावसामुळे शेतजमीन ओलीच रहात असल्याने भात पिकांवर रोगाची लागण झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. सातत्याने झालेल्या पावसामुळे येथील शेतजमीन ओलिताखाली राहिल्याने वेगवेगळ्या प्रकारचे गवत, बांडभूर लवाके असे तणही मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यात सध्या हळव्या भात शेतीची कापणी काही शेतकºयांनी केली आहे. हळवी भात दाण्यांनी भरली आहेत. मात्र वादळी पावसाने पिके शेतात पडली असून पिकावर बगळ्या आणि तुडतुड्या रोग पडला आहे. काही शेतकºयांचे पूर्ण शेतच पांढरे झाले आहे, त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ खुंटली आहे.
कासा, वाणगाव, सायवन भागातील शेतकरी आदिवासी तसेच गरीब असल्याने बºयाच शेतकºयांकडे फवारणी यंत्रे नाहीत. त्यामुळे या शेतकºयांना शासनाच्या कृषी विभागाकडून फवारणी यंत्रे व औषधे, कीटकनाशके मोफत दरात किंवा अनुदानातून पुरविण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान
विक्रमगड : तालुक्यात सध्या परतीचा पाऊस आणि आॅक्टोबर महिन्यातील कडक ऊन असे चित्र आहे. कधी मेघगर्जनेसह तर कधी विजेच्या कडकडाटानंतर येणारा पाऊस हा भात पिकाला धोका होऊन नुकसान देणारा ठरत आहे. दोन - तीन दिवसांपासून सायंकाळी पावसाचा जोर असतो. वारा पावसामुळे उभे असलेले हे भात पीक पूर्णपणे झोपून जाण्याची भीती आहे. सध्या भात पीक तयार झाले असून शेतकरी कापणीच्या तयारीत आहे. परंतु दररोज येणाºया पावसामुळे शेतकरी भात कापून ठेवत नाही. परिणामी, शेतकºयांचे दोन्ही कडून नुकसान होते आहे. तालुक्यात ८५६ हेक्टरवर भात शेती केली जाते. भात हे मुख्य पीक असून या भातावर शेतकरी अवलंबून असतो. सध्या हळवा भात पीक कापणी योग्य झाला आहे. परंतु या पावसामुळे भात कापला जात नसल्याचे शेतकरी रणधीर पाटील यानी सांगितले. तालुक्यात भात चांगला आला असला तरी परतीचा पाऊस धोका देतो का अशी अवस्था आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

खाचरात पाणी असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली
डहाणू/बोर्डी : भात पीक कापणीच्या हंगामाला दसºयाच्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे. मात्र खाचरांमध्ये ओलावा तर काही ठिकाणी पाणी असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. पिकाचे नुकसान होण्यासह, कापलेल्या भाताला सुक्या जागेवर नेताना अधिकचे मजूर खर्ची होत असून आर्थिक झळ बसत आहे. डहाणू तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते.
येथील भात उत्पादक साधारणत: हळवे आणि निमगरव्या वाणांची लागवड करतात. बारमाही पाण्याची सोय असलेले शेतकरी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर धुळपेरणीस प्राधान्य देतात. त्यामुळे दसºयापूर्वीच भात पीक कापणीला येते. या वर्षी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत वारा आणि पाऊस झाल्याने काही भागात उभी पिके आडवी होऊन दाणे भिजले आहेत.
तर समुद्रकिनाºयापासून सुमारे १५ किमी अंतरवारील खलाटी आणि त्यापुढील वलाटी क्षेत्रातील खाचरांमध्ये पाणी असून बहुतेक भागात जमिनीत ओलावा आहे. शिवाय ९ ते ११ आॅक्टोबर या काळात परतीच्या पावसा बाबतचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या प्रखर ऊन आणि वातावरणात उष्णता असल्याने जेवढी कापणी उरकता येईल त्याकडे शेतकºयांचा कल आहे.
दसºयाचा मुहूर्तावर भात कापणीला सुरु वात करण्यात आली असून सण असल्याने मजुरांची उपलब्धता कमी आहे. पुढील काळात एकाच वेळी या कामाला प्रारंभ होऊन कापणी मजुरांचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे मजुरांचे बुकिंग करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.


या तालुक्यात दसºयाचा मुहूर्त हा भात कापणीकरिता साधला जातो. मात्र एकाच दिवशी हंगामाचा प्रारंभ होत असल्याने मजुरांचा तुटवडा भासू नये म्हणून सणाच्या एक दोन दिवस आधी सुरु वात केली जाते. काही भागात खाचरत पाणी असून बºयाच क्षेत्रातील जमीन ओली आहे. परतीचा पाऊस झाल्यास त्याचा फटका कापणीला आलेल्या पिकाला बसू शकतो.
विजय किणी, भात उत्पादक शेतकरी

Web Title:  Disease infectious diseases; Continuous rainfall affects paddy cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर