निवडणुकीसाठी जिल्हाप्रशासन सज्ज; सीआरपीएफ, एसआरपीएफ तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:29 PM2019-04-26T23:29:23+5:302019-04-26T23:29:46+5:30
२६११ बॅलेट, २६११ कंट्रोल तर २८२९ व्हीव्हीपॅट युनिट्सचा होणार वापर
पालघर : पालघर लोकसभेच्या मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मतदानाच्या दिवसापर्यंत पोलीस आणि विविध पथकांना अतिशय काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक तपासण्या करण्याचे निर्देश दिले असून कोणतेही बेकायदेशीर तसेच आचारसंहितेचा भंग करणारे कृत्य आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सर्वांना मतदान करता यावे यासाठी २९ एप्रिल रोजी जिल्ह्यात सुटी जाहीर करण्यात आली असून जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही डॉ.नारनवरे यांनी केले. या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे, उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी उपस्थित होते.
18,85,297 मतदार पालघर मतदारसंघात आहेत. यामध्ये पुरु ष ९ लाख ८९ हजार आणि महिला ८ लाख ९८हजार १८६ आणि तृतीयपंथी १११ आहेत. (विधानसभा मतदारसंघिनहाय : डहाणू- २ लाख ६९ हजार ९८८, विक्र मगड-२ लाख ६४ हजार १३२, पालघर- २ लाख ७१ हजार १६७, बोईसर- २लाख ९७ हजार ९१५, नालासोपारा- ४ लाख ८७ हजार ५६०, वसई- २ लाख ९४ हजार ५३५.)
नवीन मतदार
जिल्ह्यातील मतदार नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. १ जानेवारी २०१९ नंतर ७२ हजार ३१४ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
२१७७ मतदान केंद्रे
मतदारसंघात एकूण २१७७ मतदान केंद्रे आहेत. यापैकी ग्रामीण भागात ११९२ तर शहरी भागात ९८५ आहेत. (मतदारसंघिनहाय : डहाणू ३२७, विक्र मगड- ३४८, पालघर- ३२२, बोईसर- ३५३, नालासोपारा- ४८९, वसई- ३८८)
३०७ सर्व्हिस व्होटर्स
पालघर जिल्ह्यात एकूण ३०७ सर्व्हिस व्होटर्स आहेत. (मतदारसंघ निहाय : डहाणू- १६, विक्र मगड- १२७, पालघर- ३१, बोईसर- ३४, नालासोपारा- ७९, वसई- २०) याचा उपयोग मतदानाच्या दिवशी होणार आहे.
सखी मतदान केंद्रे : ६
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ६ मतदान केंद्र ही सखी मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्रांवर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच महिला पोलीस व महिला कर्मचारी असतील.
क्रि टीकल मतदान केंद्रे- १४
यापैकी ९ मतदान केंद्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघात, ४ बोईसर आणि १ डहाणू मतदारसंघात आहेत. सदर मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक व स्वतंत्र व्हिडीओग्राफर नेमण्यात येणार आहे. तसेच तेथे केंद्रीय पोलीस दल ठेवण्यात येणार आहे.
पुरेशी मतदान यंत्रे /
वाहनांवर जीपीएस यंत्रणा
निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. एकूण २६११ बॅलेट युनिट्स, २६११ कंट्रोल युनिट्स तर २८२९ व्हीव्हीपॅट मशीन्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६५२ मशीन्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रँडमायझेशन प्रक्रि या पूर्ण झाली असून ही यंत्रे ने-आण करणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष असेल.
13,000
अधिकारी-कर्मचारी सज्ज
मतदान प्रक्रि या पार पाडण्यासाठी १२,०७२ अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत राहणार असून ३०८३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
वाहतूक व्यवस्था : निवडणुकीच्या कामकाजासाठी ३६१ एस टी बसेस, ६२० जीप, २३ ट्रक आणि ६ बोट व अन्य वाहनांची व्यवस्था केली आहे.
मतदानासाठी प्रभावी जनजागृती
मतदार जागृती अभियानाअंतर्गत व्हीव्हीपॅट आणि मतदान प्रक्रि येबाबत मतदारजागृती करण्यात आली. या माध्यमातून १३ लाखांहून अधिक नागरीकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.
दिव्यांग मतदार : दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये रॅम्पची उपलब्धता, पिहल्या आणि दुसºया मजल्यावरील मतदान केंद्रांकरीता डोली ची व्यवस्था, ब्रेल चिन्हांचा वापर, स्वयंसेवक, समाजकल्याण कार्यालय आणि अशासकीय संस्थांमार्फत व्हील चेअर्सची उपलब्धता आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी काम करणाºया १० संस्था असून मतदानासाठी दिव्यांगांना साहाय्य करण्याबाबत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.
मतदान केंद्रांवर सुविधा : मतदान केंद्रांवर शौचालय, लाईट्स, पाणीपुरवठा, रॅम्प आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांमध्ये मदत करण्यासाठी पथक, वैद्यकीय कीट अशा सोयी आदी सुविधा आहेत. पिण्याच्या पाण्याचीही स्वतंत्र सोय प्रत्येक ठिकाणी असेल. आचारसंहिता भंगाबाबत आत्तापर्यत आदर्श आचारसंहिता पथकांकडून १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५ ठिकाणी पोस्टर्स, होर्डींग्सवर कारवाई करण्यात आली आहे.
रोख रक्कम, मद्य, गुटखा जप्त : विक्र मगड मतदारसंघात स्थीर पथकाद्वारे १ लाख ७० हजार तर बोईसर मतदारसंघात २ लाख ५० हजार इतकी रक्कम जप्त केली आहे. पोलीसांनी २४ लाख ३४ हजार ३४० रूपये किमतीचे ४,३९३.८७ लीटर मद्य तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २५ लाख १७ हजार ४४९ रूपये किमतीचे ८,९७,०९५ लीटर मद्य जप्त केले तर, एकसाईजने २ कोटी ७३लाख ७१ हजार ९७७ रूपये किमतीचा बंदी असलेल्या गुटखा आणि गांजा आणि दोन वाहने जप्त केली आहेत. पोलिस यंत्रणेकडून २१ गुन्हे दाखल झाले असून पोलिस यंत्रणेचे २३० अधिकारी, ३८८५ कर्मचारी आणि होमगार्डस तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या दोन कंपन्या तैनात असणार आहेत.
मतदानासाठी ११ ओळखपत्र पुरावे
ज्या मतदारांची नावे मतदार यादीत आहेत मात्र मतदार छायाचित्र ओळखपत्र नाही ते देखिल मतदान करू शकतात. त्यासाठी खालील ११ पुरावे ग्राह्य धरले जातील. यामध्ये पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/ सार्वजनिक उपक्र म/ स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्त यांनी दिलेले स्मार्ट ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकाड आदींचा समावेश आहे.