निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:39 PM2019-03-12T22:39:05+5:302019-03-12T22:39:17+5:30

मतदार संघात एकूण २ हजार १२० मतदान केंद्र, व्हीव्हीपॅट मशीन्सची साथ

District administration ready for elections | निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

googlenewsNext

पालघर : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक २०१९ ची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने २२-पालघर (अ.ज.) मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणुक प्रक्रि येसाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यांनी पालघर येथील निवडणुकीचा कार्यक्र म आणि त्या अनुषंगाने तयारीबाबत पत्रकारांशी संवाद साधला. पालघर येथे २ एप्रिल २०१९ रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून ९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. १० एप्रिल रोजी अर्जांची छाननी होऊन १२ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास २९ एप्रिल रोजी मतदान होईल.

२३ मे २०१९ रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होऊन २७ मे रोजी निवडणूक प्रक्र ीया पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे उपस्थित होते. मतदार आणि मतदान केंद्र निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १८ लाख १२ हजार ९८३ मतदार असून त्यात ९ लाख ४९ हजार ५९२ पुरूष तर, ८ लाख ६३ हजार ३०१ महिला तर ९० तृतीयपंथी मतदार आहेत. ज्यांना मतदानासाठी मदतीची आवश्यकता भासेल अशा २ हजार ४९ दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात आली असून त्यांना आवश्यक ती मदत पुरविली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

निरंतर प्रक्रि येमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेणे सुरू असून त्यानंतर मतदार संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुन:निरिक्षण कार्यक्र मांतर्गत नवीन मतदार नोंदणी झालेल्या मतदारांपैकी एकूण १ लाख ०३ हजार ७५ इतकी मतदार छायाचित्र ओळखपत्रे प्राप्त झाली असून ती वितरीत करण्याकरीता विधानसभा मतदारसंघांकडे पाठविण्यात आली आहेत.

मतदारसंघात एकूण २ हजार १२० मतदान केंद्रे आहेत, तर ६ केंद्र एकाच ठिकाणी असतील अशी एकूण ३६ केंद्रे आहेत. ज्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १ हजार ४०० पेक्षा अधिक होईल अशा मतदान केंद्रांबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळूरू या कंपनीकडून प्राप्त झालेल्या एम ३ इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये ४ हजार ६१५ बॅलेट युनिट तर २ हजार ६८४ कंट्रोल युनिट आणि २ हजार ६८४ व्हीव्हीपॅट मशीन्सचा समावेश आहे. मशीन्सचे काम सुरळीत राहावे यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासाठी तंत्रज्ञाचे पथक तैनात असणार आहेत.

शंभर मिनिटात कार्यवाही अ‍ॅपच्या मदतीमुळे प्रक्रियेमध्ये पारदर्शकता
या निवडणूकीकरीता भारत निवडणूकआयोगाने ूश्कॠकछ हे अ‍ॅप सुरु केले आहे. मतदार, राजकीय पक्षांना आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्र ारी या अ‍ॅपवर नोंदविता येतील. तक्र ार नोंदविल्यानंतर त्यावर शंभर मिनिटांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन, विविध परवानग्या, मतमोजणीव मतदानाचा निकाल या संदर्भातील कार्यवाहीकरीता‘सुविधा’ हे ?प्लिकेशन वापरण्यात येणार आहे. तर वाहन व्यवस्थापना करीता ‘सुगम’ अ‍ॅप सुरू केले आहे.

तसेच, मतदारांना त्यांच्या मतदार यादी संदर्भातील तक्र ारी नोंदविण्याकरीता ‘समाधान’ अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. मतदारांच्या तक्र ार निवारणाकरीता मतदार मदत संपर्क क्र मांक म्हणून १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरूकरण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीसाठी सुमारे १७ हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण आणि अनुषंगिक बाबी सुरू असून महिला आणि दिव्यांग यांना जवळच्या केंद्रांवर नियुक्ती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस अधिकाºयांसमवेत बैठक झाली असून पोलीस यंत्रणाही दक्ष आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पाशर््वभूमी असलेल्या ९६२ प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाला दैनंदिन ताळमेळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमावर्ती भागामध्ये माहितीचे आदानप्रदान होण्यासाठी बैठक झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सर्व सूचनांबरोबरच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असेही डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: District administration ready for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.