अंगणवाड्यांतच रोजगार, पोषण आहारासाठी जि.प.चे प्रतिलाभार्थी १० रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 06:17 AM2018-01-28T06:17:32+5:302018-01-28T06:17:59+5:30

पोषण आहारासाठी प्रतिलाभार्थी अतिरिक्त १० रूपये जि. प. स्वनिधीतून देणार, अंगणवाड्यात गोधडी शिवण्याचा रोजगार सॅम आणि मॅम बालकांच्या मातांना उपलब्ध करून देणार, रोजगारासाठी स्थलांतरण रोखण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय सुरू करणार आदी महत्वपूर्ण घोषणा आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी केल्यात.

 District Analyst for Employment and Nutrition Diet | अंगणवाड्यांतच रोजगार, पोषण आहारासाठी जि.प.चे प्रतिलाभार्थी १० रू

अंगणवाड्यांतच रोजगार, पोषण आहारासाठी जि.प.चे प्रतिलाभार्थी १० रू

Next

पालघर : पोषण आहारासाठी प्रतिलाभार्थी अतिरिक्त १० रूपये जि. प. स्वनिधीतून देणार, अंगणवाड्यात गोधडी शिवण्याचा रोजगार सॅम आणि मॅम बालकांच्या मातांना उपलब्ध करून देणार, रोजगारासाठी स्थलांतरण रोखण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय सुरू करणार आदी महत्वपूर्ण घोषणा आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी केल्यात.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ दुग्धविकास प्रकल्प, पोलीस परेड मैदान कोळगाव येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर,पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नवनाथ जरे, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, संभाजी अडकुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’’ अधिक परिणामकारकरित्या राबविता यावी यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने एक वेळ आहाराच्या खर्चासाठी देण्यात येणार्या प्रति लाभार्थी रु . २५/- व्यतिरिक्त रु . १०/- इतका निधी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने आपल्या या उपक्र माची विशेष दखल घेऊन आपल्या प्रमाणेच इतर जिल्हा परिषदांनीही निधी उपलब्ध करु न देण्यासंदर्भाचा शासन निर्णय निर्गिमत केला आहे. ही आपल्या जिल्हयाच्या दृष्टिने अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस दलाचे संचलन झाले. त्याचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी निमति गोयल यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, दंगल नियंत्रण पथक यांची माहिती देणारे चित्ररथ सहभागी झाले होते.

अधिकाºयांचा सत्कार

बोईसरचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांना राष्ट्रपती पदक सफाळे पोलीस ठाण्याचे सपोनि. जितेंद्र ठाकूर यांना महासंचालक पदक, गडचिरोली येथे विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या स.पो.नि चव्हाण यांच्यासह नैपुण्य संपादन केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार झाला.

जिल्हा विकास निधीतून आपण नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत गोधडी शिवण्याचा उपक्र म राबविणार आहोत. ज्यामुळे सॅम व मॅम मधील बालकांच्या मातांना अंगणवाडीतच रोजगार उपलब्ध होईल. या उपक्र मासाठी १ कोटी रु पयांचा निधी दिला आहे. आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. कुक्कुट पालन, शेळी पालन याबरोबरच स्वयंरोजगार स्थानिक गावातच निर्माण करु न देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना अंतर्गत प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात कृषी, कुक्कुटपालन, गारमेंट क्षेत्रात कम्युनिटी गट तयार करु न रोजगार प्रशिक्षण सुरु आहेत.

शासनाच्या निकषाप्रमाणे आपला जिल्हा २ आॅक्टोबर, २०१७ रोजी हागणदारी मुक्त घोषित झाला आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील कुपोषण व बाल मृत्यू कमी करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. खेडी समृद्ध बनविण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

Web Title:  District Analyst for Employment and Nutrition Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.