जिल्हाधिकाऱ्यांचीही मॅरेथॉन धाव, ४२ किमी.चे अंतर साडेचार तासांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:17 AM2020-01-21T00:17:44+5:302020-01-21T00:18:44+5:30

- हितेन नाईक पालघर : स्वत:चे आरोग्य, स्वत:च्याच हाती असून ते जपायला हवे असा आरोग्य जपण्याचा अनमोल संदेश देत ...

District collector run in Mumbai marathon, 42 km distance complete in four and a half hours | जिल्हाधिकाऱ्यांचीही मॅरेथॉन धाव, ४२ किमी.चे अंतर साडेचार तासांत पूर्ण

जिल्हाधिकाऱ्यांचीही मॅरेथॉन धाव, ४२ किमी.चे अंतर साडेचार तासांत पूर्ण

Next

- हितेन नाईक

पालघर : स्वत:चे आरोग्य, स्वत:च्याच हाती असून ते जपायला हवे असा आरोग्य जपण्याचा अनमोल संदेश देत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवीत ४२ किलोमीटर अंतर ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करण्यात यश मिळवले.

आशियातील सर्वात मोठी व मानाच्या समजल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या १७ व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण ५५ हजार ३२२ धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बांद्रा रेक्लमेशन अशा ४२ किलोमीटरच्या मुख्य स्पर्धेत धावपटू म्हणून सहभाग घेत ही मॅरेथॉन ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंदात पूर्ण करण्यात यश मिळविले. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाºया एकूण ७ हजार ८०३ धावपटूंमधून २ हजार ६५३ वे स्थान प्राप्त केले. पुरुष गटातून ७ हजार ११३ धावपटूमधून २ हजार ४९६ वे स्थान तसेच ५० ते ५४ पुरुष वयोगटातून ६६४ धावपटूमधून १६४ वे स्थान पटकावले आहे.

जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. त्याचे विपरीत परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजगता दिसून येत नसल्याचेही ते म्हणाले.

शारीरिक स्वास्थ्य टिकवा
आरोग्य टिकवण्यासाठी आपला फिटनेसही तितकाच महत्त्वाचा असल्याने त्यांनी मैदानी खेळ, व्यायामासाठी पुढे यायला हवे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जीवन जगता यावे यासाठी मॅरेथॉन तसेच मैदानी खेळ खेळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: District collector run in Mumbai marathon, 42 km distance complete in four and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.