जिल्हा कोर्टासाठी न्यायमूर्तींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:39 AM2018-01-15T00:39:56+5:302018-01-15T00:40:04+5:30
येथे नवीन जिल्हा न्यायालयाची स्थापना झाल्यास जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पक्षकारांना फायदा होणार असल्याने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती पालघर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.
पालघर : येथे नवीन जिल्हा न्यायालयाची स्थापना झाल्यास जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पक्षकारांना फायदा होणार असल्याने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती पालघर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधीर गुप्ता यांनी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अभय ओक यांना केली. ते पालघरमध्ये विधी महाविद्यालयाच्या उदघाटनाला आले असता त्यांनी न्यायालयाला भेट दिली. स्वागत जिल्हा न्यायाधीश गुल्हाने यांनी तर उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अॅड.व्ही ए.गांगल यांचे स्वागत सचिव अॅड. अवतारु गुप्ता यांनी केले. पालघर मध्ये बार शेड, मोटार अपघात प्राधिकरण आदी त्यांच्याच प्रयत्नाने मिळाल्याने त्यांनी आता जिल्हा न्यायालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास जिल्हावासीयांना त्याचा लाभ मिळेल असे अॅड.गुप्ता ह्यांनी आवाहन केले. यावर जिल्हा न्यायालयाचा आराखडा बार असोसिएशन व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, ठाणे यांच्या सूचनेनुसार आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच उच्च न्यायालायच्या निर्देशानुसार सात दिवसाच्या आत जमिनीचे अर्ज निकाली काढण्याची जबाबदारी न्यायाधीश, सरकारी वकील व बचाव पक्षाचे वकील यांची असल्याचे ही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावेळी अॅड.चिन्मय राऊत, धरमसेन गायकवाड, अतुल पाटील, दिनेश दवडा, तकी चिखलेकर, श्वेता मेटकरी, अमतिा पाटील, व तेजल ठाकूर उपस्थित होते.