जिल्ह्याचा ९३.०४ टक्के निकाल

By admin | Published: June 8, 2015 11:00 PM2015-06-08T23:00:51+5:302015-06-08T23:00:51+5:30

एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

District's 9 3.04 percent result | जिल्ह्याचा ९३.०४ टक्के निकाल

जिल्ह्याचा ९३.०४ टक्के निकाल

Next

पालघर : यावर्षी एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोखाडा तालुक्याचा सर्वाधिक ९८.०१ टक्के तर तलासरी तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजे ८६.४५ टक्के इतका निकाल लागला आहे.
सोमवारी आॅनलाईन पद्धतीने एस.एस.सी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता लागला. यामुळे ग्रामीण भागातील पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांची शहरातील सर्वच सायबर कॅफेमध्ये गर्दी बघायला मिळाली.
जिल्ह्यातील ४६१ शाळांमधून एकूण ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६१ शाळामधून १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
पालघर तालुक्यातील ७८ शाळांमधून ६ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार २१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला. २० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. डहाणू तालुक्यातून ४८ शाळामधून ४ हजार २७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९३५ विद्यार्थी उर्त्तीण झाले. तालुक्याचा निकाल ९१.९६ टक्के लागला असून ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
वाडा तालुक्यातील ३१ शाळांमधून २ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होती. त्यातील २ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९३.३० टक्के लागला असून १२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मोखाडा तालुक्यातील १९ शाळा मधून १ हजार १०४ विद्यार्थ्यांमधून १ हजार ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल ९८.०१ टक्के लागला असून ९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विक्रमगड तालुक्यातील २४ शाळांमधून १ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ८९.९९ टक्के लागला . ७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जव्हार तालुक्यातून २४ शाळांमधून १ हजार ५९४ विद्यार्थ्यांमधून १ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी ९५.२३ आहे.
११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तलासरी तालुक्यातून २१ शाळांमधून १ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील १ हजार ६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ८६.४५ टक्के लागला तर दोन शाळांचा निकाल शंभर टक्के.
(वार्ताहर)

Web Title: District's 9 3.04 percent result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.