बोईसर-चिल्हेरफाटा रस्त्याला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:40 PM2018-09-06T23:40:09+5:302018-09-06T23:40:23+5:30

तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते.

 Do you delay the Boisar-Chilchefata road? | बोईसर-चिल्हेरफाटा रस्त्याला विलंब का?

बोईसर-चिल्हेरफाटा रस्त्याला विलंब का?

Next

- पंकज राऊत

बोईसर : बोईसर रेल्वे उड्डाणपूल ते चिल्हार फाटा हा मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या कामाची मुदत ही ३१ आॅगस्ट १८ ला संपली तरी या रस्त्याचे बहुतांश काम अपूर्ण असल्याने या विलंबाला जबाबदार असलेल्यांची चौकशी करून ते युद्ध पातळीवर करण्याची मागणी सर्वत्र होत आहे
तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते. अशा प्रसंगी जलदपणे परीवहन व्हावे याकरिता एकमेव व मुख्य आणि सोयीचा असलेल्या बोईसर-चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरण व मजबुती करण करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता वेगवेगळ्या कारणांमुळे व विविध खात्याच्या काही अधिकाºयांच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे मुदतीत पुर्ण होऊ शकला नाही, हा रस्ता बांधताना सुरुवातीपासून निश्चितपणे जमिनीच्या व इतर काही अडचणी आल्या होत्या. परंतु त्या सामोपचाराने दूर करण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, मंडळ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शेतकरी व आदिवासी संघटनेचे नेते व पदाधिकारी यांनी समन्वय साधून मार्ग काढला असता तर आज या रस्त्यावरून धोकादायन प्रवास करण्याची वेळ आली नसती तर वादग्रस्त जागा सोडून पुढील रस्ता करण्यास प्राधान्य दिले असते तर रस्त्याचे चौपदरीकरण झाले असते.
ज्या जमिनीचा सात बाºयावर अजुनही काही शेतकºयांचीच नावे असल्याने त्यांनी आक्षेप घेऊन रस्ता उभारणीचे काम बंद पाडले आहे.

शेतकºयांचा झाला तोटा
- जमिन संपादित केली त्यावेळी अधिकाºयांनी ७/१२ एमआयडीसीच्या नावे केले नाहीत. यामुळे त्या शेतकºयांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांकरिता जे काही फायदे मिळतात ते मिळाले नाही याचाही मोठा तोटा त्यांना सहन करावा लागला.

Web Title:  Do you delay the Boisar-Chilchefata road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.