रुग्णांच्या नातेवाइकांपासून डॉक्टर असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:55 AM2018-04-15T05:55:44+5:302018-04-15T05:55:44+5:30
पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकाचे डॉक्टरांशी झालेल्या बाचाबाचीने रु ग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले पोलीस अचानक काढून घेतल्याने डॉक्टरांना असुरिक्षततेच्या वातावरणात रुग्णावर उपचार करावे लागत आहेत.
- हितेन नाईक
पालघर : पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकाचे डॉक्टरांशी झालेल्या बाचाबाचीने रु ग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले पोलीस अचानक काढून घेतल्याने डॉक्टरांना असुरिक्षततेच्या वातावरणात रुग्णावर उपचार करावे लागत आहेत.
जेजे रु ग्णालय व केईएम रु ग्णालया सह इतर ठिकाणी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी यासाठी महाराष्ट्रभर डॉक्टरांनी आंदोलन पुकारले होते. यावर प्रत्येक सरकारी रु ग्णालयात पोलीस तैनात करावेत असे आदेश शासनाने पारित केले होते. त्यानुसार महाराष्ट्रासह पालघरमधील सर्व रुग्णालयात तेथील कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची सुरक्षेसाठी दिवसरात्र पोलीस नेमण्यात आले होते.
मात्र, काही काळानंतर कुठलीही पूर्वसूचना न देताच पोलीसाना तेथून हलविण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांवर होणाºया हल्ल्याच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. पर्यायी रु ग्णालयांनी आता आपले सुरक्षा कर्मचारी तैनात केले असले तरी त्यांचे भय धुडगूस घालणाºयांना राहिलेले नाही. अशा परिस्थितीत पुन्हा डॉक्टर अथवा कर्मचाºयांवर तिºहाईत व्यक्तीमार्फत हल्ला झाल्यास डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनाचा फटका रुग्णाला बसू शकतो. यात रुग्ण दगवल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पालघर जिल्ह्यात ३ उपजिल्हा
रु ग्णालये असून ९ ग्रामीण रु ग्णालये आहेत. याअंतर्गत दोन्ही प्रकारची रु ग्णालये मिळून सुमारे १५ डॉक्टर्स व ७० कर्मचारी जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यसेवेची जबाबदारी पार पाडत आहेत.
अशा स्थितीत गंभीर असलेल्या रु ग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून डॉक्टरांना किंवा कर्मचाºयावर विश्वास ठेवून आपल्या रु ग्णास चांगल्यात चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करायला हवे. अश्यावेळी डॉक्टर, कर्मचाºयांकडून हयगय झाल्याचे आढळून आल्यास त्यांना कायदेशीर प्रक्रिये नुसार त्यांच्यावर कारवाई होण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत.
जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची व जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा सांभाळत असलेल्या या आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अत्यावश्यक असून त्यादृष्टीने राज्य शासन पातळी वरून पोलीस विभागाला सूचना देत त्यांच्या सुरिक्षतते साठी प्रत्येक दवाखान्यात पोलीस तैनात करायला हवेत अशी मागणी होत आहे.
पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवूनही कोणताही प्रतिसाद नाही
जिल्ह्यातील उप-जिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील पोलीस सुरक्षा बंदोबस्त काढून घेतल्याचे लक्षात येताच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यासाठी पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास दिनांक
५ एप्रिल २०१८ रोजी पाठविण्यात आलेले आहे. मात्र, आजतागायत त्या कार्यालयामार्फत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा नातेवाईक मोबाइलद्वारे रु ग्णालयाच्या आत शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती विभागामध्ये फोटो घेत असताना तेथे उपस्थित असलेल्या डॉ. मोरे यांनी त्याला तसे करण्या बाबत हटकले. मात्र रागाच्या भरात त्या व्यक्तीने डॉक्टराशी बाचाबाची करीत त्यांना धक्काबुक्की केली. ह्या विरोधात डॉक्टरांनी पालघर पोलिसात
तक्र ार दिली आहे.
आम्हाला देण्यात आलेले पोलीस संरक्षण पूर्व सूचना न देता काढून घेण्यात आल्याने डॉक्टरांशी वादावादी आणि त्यांच्यावर हल्ल्या च्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत.त्यामुळे पुन्हा पोलीस संरक्षण मिळावे.
- डॉ. दिनकर गावित, अधीक्षक, ग्रामीण
रु ग्णालय,पालघर