डहाणूत चिकू आपत्ती निवारण बैठक संपन्न, बागायतदार शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 05:38 AM2017-09-10T05:38:10+5:302017-09-10T05:40:36+5:30
बोर्डी: चिकू उत्पादक संघाच्यावतीने चिकू आपत्ती निवारण बैठक शुक्र वारी कंक्राडी येथे पार पडली. या वेळी उपस्थित बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या निर्णयाला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्र मात संमती देण्यात आली.
पालघर जिल्ह्यात साडेसातहजार हेक्टेर चिकू बागायतीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेचारहजार डहाणू तालुक्याचे आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, विविध रोगाचा प्रादुर्भाव आणि हमी भाव आदीच्या अभावामुळे बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा चिकू फळाला लागू करण्यात आला आहे. मात्र त्यातील काही अटींमुळे लाभ मिळताना अडचण येत असूनही शासनाकडून मदतीचा हात दिला जात नाही.
तथापी सर्वसामान्य बागायतदारांच्या हिताकरीता शुक्र वार, ८ सप्टेंबर रोजी चिकू आपत्ती निवारण बैठक कंक्र ाडी येथे घेण्यात आली.
या वेळी जिल्हा कृषी अधिक्षक श्री. आर.जी.पाटील, कर्जत भात संशोधन केंद्राचे चव्हाण, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनस्पती व कीडरोग शास्त्रज्ञ डॉ. दळवी तसेच पालघर कृषी विभागाचे वनस्पती कीडरोग शास्त्रज्ञ डॉ. मालसे, डॉ. गंगावणे व डॉ. धाने या तज्ञांप्रमाणेच जिल्ह्यातील बागायतदार उपस्थित होते.
दुपारच्या सत्रातील सभेला सुरु वात होण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींसह विनायक बारी, यज्ञेश सावे, देवेंद्र राऊत, अनिल पाटील या बागायतदारांनी तालुक्यातील सरावली, सावटा, जामशेत, कंक्र ाडी या भागातील चिकू बागायतींची पाहणी केली. या वेळी रोगग्रस्त चिकू बागेची स्थिती खूपच भयवाह असल्याचे दिसून आले. सापूर बच्चूभाई बारी यांच्या सरावली येथल्या बागेत एकेका झाडाखाली १०० किलो फळगळती झाल्याचे शेतीनिष्ठ पुरस्कार विजेता शेतकरी देवेंद्र राऊत यांनी सांगितले.
या वर्षी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन चिकू बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती वाचवायची असल्यास शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळावी या करीता मुख्यमंत्र्यांसह कृषी आणि महसूल विभागाकडे निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
- विनायक बारी
(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ)