बळीराजाच्या खात्यात छदामही नाही, पालकमंत्र्यांची घोषणा हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:31 AM2017-11-29T06:31:51+5:302017-11-29T06:32:31+5:30
१८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही
पालघर : १८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही यातील एकाही शेतक-याच्या बॅक खात्यावर एक दमडीही जमा झाली नसल्याचे वास्तव पालघर मधील सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयातील अधिकाºयांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा हवेत विरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
पालघर येथे १८ आॅक्टोबर रोजी झालेल्या कर्जमुक्त शेतकºयांचा सन्मान सोहळा व प्रारंभ कर्जमुक्ती कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ३३ शेतकºयांची निवड करून या थकबाकीदार शेतकºयांना त्यांच्या पत्नीसह कर्जमाफीची प्रमाणपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान ही करण्यात आला होता. जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतकरी कर्जमुक्त झाले असून तुम्हाला नवीन कर्ज घेता येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गा मध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले होते.
मात्र कालांतराने २३ हजार शेतकºयांचे जाऊ द्या परंतु प्राथमिक तत्वावर ज्या ३३ थकबाकीदार शेतकºयांना कर्जमुक्त केल्याची प्रमाणपत्रे वाटली होती त्यांच्या खात्यात आजतागायत या कर्जमुक्तीचा एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकºयांना कर्जमुक्तीचे दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात दिवास्वप्न ठरले आहे.
ही कर्जमुक्ती न झाल्याने शेतकºयांचा सातबारा आजही गहाणच आहे. यामुळे कर्जमुक्त झालेल्या किंवा असलेल्या शेतकºयांना रब्बीचे पिककर्जही मिळू शकत नाही.
जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सुर आहे. ह्या कर्जमाफी बाबत पालघरच्या उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयाशी अनेक वेळा संपर्क करूनही माहिती दिली जात नाही. शासनस्तरावरून कर्जमुक्ती अर्जावर प्रोसेस सुरू आहे, कर्जमाफी दिली की नाही ह्या बाबत आम्ही कुठलेही भाष्य करू इच्छित नाहीत असे एका अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी कर्जमात्रीचे प्रमाणपत्र देऊनही त्यांची खाती रितीच
मागे मुंबईत झालेल्या राजा शिवाजी महाराज कर्जमुक्ती सन्मान योजनेअंतर्गतच्या कार्यक्र मात वाडा तालुक्यातील दोन शेतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्रे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. मात्र, त्यानंतर आजपर्यंत या दोन्ही शेतकºयांच्या खात्यावरही कर्जाची रक्कम जमा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या शेतकºयांची कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारने क्रु र चेष्टा चालविली असून ह्या विरोधात जिल्ह्यात आंदोलन उभारण्याचे पत्र आम्ही जिल्हाधिकाºयांना दिले आहे, असे राष्ट्रवादी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी सांगितले.