देहेरा देवगावच्या महिलांचा दारूबंदीचा नारा, पोलीस व एक्साइज करते काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:42 AM2017-09-12T05:42:30+5:302017-09-12T05:42:37+5:30
दारू विक्रीला आळा बसावा म्हणून देहेरा देवगाव आदिवासी महिलांनीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील महिला एकत्र येवून गत ग्रामसभेत तसा ठराव घेण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गाव-पाड्यात दारू बंदीची भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : दारू विक्रीला आळा बसावा म्हणून देहेरा देवगाव आदिवासी महिलांनीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील महिला एकत्र येवून गत ग्रामसभेत तसा ठराव घेण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गाव-पाड्यात दारू बंदीची भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे.
तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली देहेरा देवगाव ग्रामपंचायत आहे. तिच्या हद्दीत देहेरा, देवगाव, उक्षीपाडा, कडव्याचीमाळी, बोरीचामाळ, जळविहिरा, नवापडा, खडकीपाडा असे आठ गाव पाडे येतात. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३ हजार ५४३ येवढी आहे. या देहेरे ग्रामपंचायतीत आदिवासी विकास विभागाचे आश्रम शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय आहे. तसेच प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा आहेत. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात दारूची बंदी असतांनाही देहेरा देवगाव ग्रामपंचायतीत दिवसेंदिवस दारू विक्र ीचे व दारू पिणाºयांचे प्रमाण वाढत चालले होते. अनेक कुटुंबांचे संसार उघडयावर येऊन वाद, भांडणे निर्माण झाली होती.
देहेरा देवगाव ही ग्रामपंचायत दादरानगर हवेलीला लागून असल्याने दमण दारूची विक्र ी या गावात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. देहेरा, देवगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये उघडपणे दारू विक्र ी होत असल्याने जव्हर पोलीस व राज्य उत्पादन शुल्प विभाग काय करतेय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दारू बंदी व्हावी म्हणून महिलांनी बोर्ड लावून विरोध केला आहे.
मद्यपान हा एक आजार - फा. ज्यो परेरा
वसई : मद्यपान हा एक कधी बरा न होणारा आजार आहे. अशा व्यक्तींना मदत करा. कृपा फाऊंडेशनमध्ये आम्ही व्यसनाधिन व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देतो. या प्रक्रियेत श्रध्देचा पैलू समाविष्ट झाला आहे. निर्व्यसनीपणा जोपासायची असेल तर ध्यान साधनेच्या माध्यमातून आध्यात्माचा मार्ग चोखाळावा लागतो, असे प्रतिपादन कृपा फाऊंडेशनचे संचालक फा. ज्यो परेरा यांनी वसईत बोलताना व्यक्त केले.पद्मश्री फा. ज्यो परेरा यांच्या व्यसनाधिनता आणि ध्यान साधना या पुस्तकाचे प्रकाशन पापडी येथे वसई धर्मप्रांताचे विकर फा. ज्योएल डिकुन्हा यांच्या हस्ते झाले.
अ़नामिक मद्यपी संघटनेचे खंदे पुरस्कर्ते डॉ. कार्ल जी. युंग यांनी मद्यपानासारख्या विकृत्तीशी मुकाबला करण्यासाठी परमेश्वराच्या कृपेची नितांत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केल्याचेही फा. परेरा यांनी पुढे बोलताना सांगितले. परमेश्वराशी अगदी जाणिवपूर्वक सदैव संपर्कात राहून माणूस हा आजार आटोक्यात ठेवू शकतो. अशा सुधारण्याच्या मार्गावर असलेल्या लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे वाटेवरील सोबती ठरणार आहे. व्यसनाधिनतेची वैज्ञानिक चिकित्सा आणि ध्यान साधनेचा सराव ह्या दोहोंचा संगम या पुस्तकात घडवून आणला आहे, असे फा. ज्योएल परेरा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वसई विरार महापालिकेचे स्थायी समिती सभापती अफीक शेख, माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी, कामगार नेते मार्कुस डाबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश प्रजापती, नगरसेवक संतोष वळवईकर, डॉ. पल्लवी बनसोडे, डॉ. भक्ती चौधरी, डॉ. विनय सालपुरे, इव्हेट कुटीन्हो, डॉ. राणी बदलानी यावेळी प्रमुख पाहुणे होते.
असा आहे ग्रामसभेचा आदेश
देहेरा देवगाव ग्रामपंचायतीतील महिला, सरपंच व सदस्यांनी ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन आदेश काढला असून त्यामध्ये दारूची विक्र ी करनाºयावर १ लाख रुपयांचा दंड, गुळाची विक्री करणाºया दुकांनदारावर ५ हजार रुपयांचा दंड तर बाहेर गावातून दारू पिऊन आला व बाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास झाला तर त्या मद्यपीवर २५ हजार रु पयांचा दंड ठेवण्यात येणार आहे. असा ठराव महिलांनी ग्रामसभेत करून घेण्यात आला आहे. गाव पाड्यात बॅनर बाजी करून, दवंडी, घोषणा देवून ग्रामपंचायतभर कळविण्यात आले आहे.ं