शौचालयांच्या अनुदानावर डल्ला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:07 AM2018-01-20T01:07:28+5:302018-01-20T01:07:31+5:30
विक्रमगड तालुक्यातील उटावली ग्रामपंचायतीमधील २११ शौचालय लाभार्थ्यांचे अनुदान फक्त कागदे रंगवुन हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.
तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील उटावली ग्रामपंचायतीमधील २११ शौचालय लाभार्थ्यांचे अनुदान फक्त कागदे रंगवुन हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपसरपंच सुरेश पालवी यांनी विक्रमगडच्या गटविकास अधिकाºयांकडे तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे.
उटावली ग्रुप ग्रामपंचायत असून वर्ष २०११ ते २०१६ या काळामध्ये शौचालय लाभार्थ्यांची यादी मंजुरीसाठी जिल्हा मुख्यालयाकडे पाठवली होती. त्यातील २११ शौचालये वर्ष २०१६-१७ दरम्यान मंजूर होऊन त्याचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, ही माहिती फक्त ग्रामसेवक व सरपंच यांना माहिती असल्याने व बॅँकेमध्ये असणाºया खात्यावर या दोघांच्याच संयुक्त स्वाक्षºया असल्याने त्याचा फायदा उचलण्यात आला. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी पैसे मिळतील म्हणून गावकºयांनी खड्डे खोदून ठेवले. ग्रामसेवक व सरपंच याना गावकºयांनी वारंवार विचारणा केल्यावर शौचालय उभारणी साठी पैसे आले की कळवू अशी थातूर मातूर उत्तरे देण्यात येत होती.
दरम्यान, याच काळामध्ये मुंबईतील रोटरी क्लब कडून सुद्धा ८० शौचालयांची उभारणी करण्यात आली. यासाठी गावामध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले होते. क्लबला सर्वांनाच शौचालये बांधुन देणे शक्य नसल्याने काही कुटुंबाचीं निवड करण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने क्लबने केलेला खर्चही स्वत: केल्याचे दाखवून सर्वांचीच दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अनेक लाभार्थी शौचालय खड्डे खोदुन अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. त्याच प्रमाणे १५ मयत लाभार्थी याच्या नावाने परस्पर अनुदान लाटल्याचा निवेदनात आरोप करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या एमआरजीएसच्या योजनेतून काही आदिवासी कुटुंबाना शौचालय बांधून देण्यात आली. हे सर्व लाभार्थी दाखवून शौचल्याचे आलेले लाखो रु पये हडप करण्यात आल्याची तक्र ार उटावली ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश पालवी यांनी केला आहे.
टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार
अनेक कुटुंबे खड्डे खोदून शौचालय उभारण्यासाठी पैसे येतील या आशेवर आज सुद्धा वाट पाहात आहेत. या गावातील उपसरपंच सुरेश पालवे यांच्या कडे काही
लाभार्थ्यांनी संपर्क साधला असता केलेल्या चौकशीमध्ये शौचालय मंजूर यादी प्रमाणे प्रतिक्षेमध्ये
असणाºया लाभार्थ्यांना रक्कम मंजूर करून ती वाटप झाल्याचे दाखिवण्यात आले आहे. तसेच जे लाभार्थी
मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या नावे सुद्धा या रक्कमा काढल्याची बाब समोर आली आहे.
उटावली ग्रामपंचायतीमधील शौचालयाचा निधी हडप केल्या संदर्भात आमच्या कडे तक्र ार आली आहे. त्या अनुषंगाने चौकशीसाठी विस्तार अधिकाºयांची नेमणुक केली आहे. मी स्वता चौकशीसाठी जाऊन आलो आहे. या प्रकरणाचा जो काही रिपोर्ट तयार होईल तो वरिष्ठ पातळीवर पाठविला जाईल.
- सी. एल. पवार,
गट विकास अधिकारी (पं. स. विक्रमगड)