डहाणूत बुलेट ट्रेनचा सर्व्हे रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:42 AM2018-12-21T05:42:12+5:302018-12-21T05:42:33+5:30
शेकडो आदिवासी शेतकरी रस्त्यावर : सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाºयांना अक्षरश: पिटाळले
डहाणू : तालुक्यातील जामशेत गोरवाडी येथे बुधवारी बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना माकप आणि कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: पिटाळले. सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला तिव्र विरोध करुन सरकारचा निषेध करण्यात आला. ७ डिसेंबर रोजी कोटबी या ठिकाणी कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकºयांच्या तीव्र विरोधानंतर बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षण रोखले होते.
कष्टकरी संघटनेच्या मधु धोडी आणि माकपच्या जनवादी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा लहानी दौडा, रघुनाथ सुतार यांनी शेतकºयांचे नेतृत्व केले. जमशेत येथे मंगळवारी सकाळी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती शेतकºयांना मिळाली. त्यानंतर लागलीच आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर अधिकाºयांना मागे परतावे लागले. बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला डहाणू तालुक्यातील गावांनी अनेकवेळा तीव्र विरोध केला आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे विरोध करण्यात आलेला आहे. मात्र, तरी सर्वेक्षणाचा प्रयत्न होत आहे.
शिवसेनेने केलाय विरोध
शिवसेनेनेच्या नेत्या नीलम गोºहे यांनी डहाणूतील जमशेत या गावात बुलेट ट्रेनला विरोध करणार असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती. असे असताना मात्र बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी, पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाºयांना सोबत घेऊन सर्वेक्षणाचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन आणि शेतकरी असे चित्र ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळत आहे दिनांक ५ आॅक्टोेबर रोजी सुद्धा कोटबी येथे शेतकºयांनी बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी तीव्र विरोध केला होता.