वसई जवळच्या नायगाव खाडी रेल्वे पुलाला मोठ्या जहाजाची धडक; जहाजाला जलसमाधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 10:33 AM2021-02-14T10:33:18+5:302021-02-14T10:48:47+5:30

drager sinks after hitting naigaon railway bridge: रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची (ड्रेझर) चोरीछुपे  वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस

drager sinks after hitting railway bridge over Naigaon creek near Vasai | वसई जवळच्या नायगाव खाडी रेल्वे पुलाला मोठ्या जहाजाची धडक; जहाजाला जलसमाधी 

वसई जवळच्या नायगाव खाडी रेल्वे पुलाला मोठ्या जहाजाची धडक; जहाजाला जलसमाधी 

googlenewsNext

वसई: मुंबई व गुजरातला जोडणारा अतिशय महत्त्वाचा अशा एकमेव रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची (ड्रेझर) चोरीछुपे  वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. वसई जवळच्या नायगाव रेल्वे पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली असून  या धडकेत रेल्वे पुलाच्या दोन पिलरमधील मधल्या भागांचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. (drager sinks after hitting naigaon railway bridge)

एक भला मोठा ड्रेझर दोन पुलाच्या खालून पास होताना पुलाला धडकला. यामुळे रेल्वे पुलाला  काही ठिकाणी तडे गेलेले आहे तर काँक्रिटचा भागदेखील मोठ्या प्रमाणावर निखळून पडला आहे. जवळपास अर्धा ते एक फुटाचं काँक्रिट या अपघातात निघालं आहे. तर ही घटना घडल्यानंतर ड्रेझर हा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे समजते. दोन दिवसांनंतरही ड्रेझर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आहे. हा ड्रेझर जवळपास ५० फूट लांब आणि २० ते २५ फूट रुंद असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारची घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. याआधी २०१४ मध्येही असाच मोठा अपघात येथे घडला होता. मात्र हे ड्रेझर  नेमके येतात कुठून? व ते जातात कुठे? आणि यांना  नेमकी परवानगी आहे का ? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेने रेल्वे पुलाचा बऱयापैकी काही भाग तुटल्याने या पुलाची तात्काळ  पाहणी करून तो कितपत निकामी झाला आहे हे पाहावं लागणार आहे. 

नायगाव रेल्वे पूल म्हणजे मुंबई व गुजरात राज्यांना जोडणारा दुवा!
परिणामी  ज्या ठिकाणी या पुलाचा  भाग तुटला आहे त्यावरून दररोज शेकडो फेऱ्या लोकल ट्रेनच्या होत आहेत. हा पूल मुंबई व गुजरातला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रेल्वे पुलावरून दररोज लोकल व एक्स्प्रेस गाड्या गुजरात ते मुंबई असा प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आता तांत्रिक व सुरक्षितता म्हणून  योग्य पाहणी करून अहवाल सादर करावा लागणार आहे. 

Web Title: drager sinks after hitting railway bridge over Naigaon creek near Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.