बंधाऱ्यांमधून गाळ काढल्याने परिसर पाणीदार; रोजगार हमी योजनेतून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:41 PM2020-02-03T23:41:28+5:302020-02-03T23:41:53+5:30
२८० मजुरांना मिळाला रोजगार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील खांड व उघाणी परिसरात बांधण्यात आलेल्या तीन कोल्हापूर टाईप बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पुरामुळे गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडेझुडुपेही वाढली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत या बंधाºयांमधील गाळ काढण्यात आल्याने आता बंधाºयांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मजुरांमार्फत कामे सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत ओंदेअंतर्गत येणाºया खांड व उघाणी या गावालगतच्या तीन कोल्हापुरी बंधाºयांतून नुकतेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत गाळ काढण्यात आला. हा गाळ जवळजवळ २७० ते २८० मजुरांमार्फत उपासण्यात आला. या मजुरांना दिवसाकाठी सरासरी २०५ ते २०६ रुपये मजुरी मिळाली आहे. या बंधाºयांतील गाळ काढल्याने बंधाºयांचे पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत खुले झाले आहेत. पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
बंधारा परिसरालगत असलेल्या शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. शेतीत उन्हाळी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देणे शक्य होणार आहे. येथे नैसर्गिकरीत्या लाभलेले जलस्त्रोत कार्यान्वित केल्याने आता पाण्याची टंचाई भासणार नाही. बंधाºयांलगतचा परिसर पाणीदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच रोजगार हमीअंतर्गत नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती ओंदे ग्रुप ग्रामपंचायतच्या रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक रूपेश जाधव यांनी दिली.
ओंदे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खांड व उघाणी येथील रोहयोअंतर्गत मजुरांमार्फत तीन बंधाºयांतील गाळ काढण्यात आला आहे. नाला खोलीकरण, सार्वजनिक मैदान सपाटीकरण व गावतलावातील गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. -वंदना प्रसाद, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, ओंदे बंधाºयांतील गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्हला ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशी कामे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावीत, जेणेकरून आम्हाला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.
- मदन शांताराम गोविंद, रोहयो मजूर, खांड
कोल्हापुरी बंधाºयांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता, त्याचप्रमाणे झाडे-झुडुपे वाढली होती. आता गाळ काढल्याने पाणीसाठा होऊन लगतच्या शेतकºयांना पिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.
- विलास भाऊ पवार, बंधाºयांलगतचे शेतकरी
ग्रा.पं.ओंदे हद्दीमधील रोहयोअंतर्गत गाळ काढायचे काम झाले. त्यासाठी रोजगार सेवक, ग्रामसेवक, स.का.अधिकारी व तांत्रिक सहाय्यक यांचे मोलाचे योगदान लाभले.
-आकाश आळशी, तांत्रिक सहाय्यक