स्वप्नपूर्तीने हडपला लाखोंचा निधी, फुलशेती योजनेचा बहाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:39 PM2018-12-03T23:39:45+5:302018-12-03T23:40:05+5:30

जव्हार प्रकल्पाच्या न्यूक्लीअस बजेट अंतर्गत २०१४-१५ च्या दरम्यान मोखाडा येथील आदिवासी स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेने फुलशेती योजना राबविण्यासाठी मिळालेला अनुदानाचा निधी परस्पर हडपल्याची बाब समोर आली आहे.

Dream interpretation of millions of funds, funding of flower scheme | स्वप्नपूर्तीने हडपला लाखोंचा निधी, फुलशेती योजनेचा बहाणा

स्वप्नपूर्तीने हडपला लाखोंचा निधी, फुलशेती योजनेचा बहाणा

Next

- रविंद्र साळवे

मोखाडा : जव्हार प्रकल्पाच्या न्यूक्लीअस बजेट अंतर्गत २०१४-१५ च्या दरम्यान मोखाडा येथील आदिवासी स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेने फुलशेती योजना राबविण्यासाठी मिळालेला अनुदानाचा निधी परस्पर हडपल्याची बाब समोर आली आहे.
फुल शेतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून आदिवासी बांधवांचे जीवनमान उचवण्यासाठी जव्हार प्रकल्पाने २०१४ मध्ये २० लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार ६२५ प्रमाणे २ लाख १२ हजार पाचशे रुपये अनुदान या संस्थेला दिले होते परंतु संस्था चालकाने लाभार्थ्यांना कोणतीच कल्पना न देता परस्पर हा निधी हडप केला आहे याबाबत काही लाभार्थ्यांना विचारले असता आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही ही व आम्हाला अनुदानही मिळाले नाही यामुळे फुल शेतीच्या नावाखाली तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने या संस्थेने आदिवासींच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले आहे यामुळे हा निधी देण्या मागचा उद्देश बासनात गुंडाळून ठेवला गेला असून योजना राबविण्याच्या अटी, शर्तींना पूर्णपणे बगल दिली गेली आहे. त्यामुळे या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
>आम्हाला याबाबत कोणतीच माहिती नाही मला 10 हजार ६२५ रुपयांचे अनुदान मिळाले नाही व ही संस्था कुणाची हेही ठाऊक नाही आमच्या नावावर पैसे काढून खाणाºया या संस्थेवर कारवाई होईला हवी
- अशोक पवार, पोशेरा
>या संस्थेची चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल
- अजित कुंभार,
प्रकल्प अधिकारी, जव्हार

Web Title: Dream interpretation of millions of funds, funding of flower scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.