पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:03 AM2019-05-28T00:03:37+5:302019-05-28T00:07:08+5:30

शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे.

Drinking water well gets turbid water | पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी

पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी

Next

- जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे. भातसा, तानसा, वैतरणा या मोठ्या जलाशयांच्या परिसरात पाणीटंचाईमुळे आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेले गाव म्हणजे खोर. या गावात जाताना दुचाकीचालकाला रस्ता शोधावा लागतो आहे. अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. गावात असणाऱ्या विहिरींमध्ये पाणी नाही. एवढेच नव्हे तर गावात पाण्याची सोय व्हावी, म्हणून जो हौद खोदायला घेतला आहे, त्यात गढूळ पाणी लागले आहे. हेच पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत आहेत. गावातील विहिरीला लागून असलेला तलावही कोरडा झाल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
६० ते ६५ घरे असणाºया या गावाची लोकसंख्या सव्वाशेच्या आसपास आहे. माहुलीच्या पायथ्याशी हे गाव आहे. पहिल्याच पावसात या गावाची पाणीटंचाई मिटते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत गावातील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वनीता बच्चू चौधरी यांनी सांगितले.
सध्या गावात प्यायला पाणी नसल्याने जी विहीर बांधायला घेतली आहे, त्या विहिरीतील सिमेंटमिश्रित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करत असल्याचेही वनीता चौधरी सांगतात.
या गावात अनेक वर्षांपूर्वी रस्ता झाला होता. मात्र, त्यानंतर रस्त्याची अवस्था वाईट असून दुचाकी चालवताना कसरत करावी लागते.
>गावात प्यायला पाणी नसल्याने नागरिक दूरवरून पाणी आणत आहेत. तर, बºयाचवेळा लोक नवीन बांधकाम सुरू असलेल्या विहिरीतील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरतात.
- ढवळू भिका, ग्रामस्थ खोर
>आमच्याकडे टँकरने पाणी पुरवण्याचा प्रस्ताव आल्यास पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल.
- एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Drinking water well gets turbid water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.